महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्वाचा वाद म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे होणार शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे होणार? हा विषय चर्चेत होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयावर दोन्ही गटाची सुनावणी घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाची झाली, असा शिक्कामोर्तब एकप्रकारे झाला आहे.
आमचा शिंदे गट नाही तर शिवसेना – नरेश म्हस्के
आमचा शिंदे गट म्हणून उल्लेख करू नका, कारण धनुष्यबाण आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध झाले आहे, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली.
Join Our WhatsApp Community