Dhar Bhojshala Dispute : मध्य प्रदेशातील भोजशाळेचेही होणार सर्वेक्षण; मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा खरा ठरणार?

184
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने सोमवारी, ११ मार्च रोजी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळेचे (Dhar Bhojshala Dispute) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाला सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली. हिंदू धर्मीय भोजशाळेला देवी सरस्वतीचे मंदिर असल्याचे मानतात, तर मुस्लिम त्याला मशीद मानतात. वकील विष्णू शंकर जैन यांनी X वर एका पोस्टमध्ये न्यायालयाचा आदेश शेअर केला आहे.

सर्वेक्षणानंतर हिंदूंना पूजेचा अधिकार देण्याविषयी निर्णय 

यावर्षी फेब्रुवारीमध्ये, एका हिंदू संघटनेने येथील मध्य प्रदेश उच्च न्यायालयात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ला जवळच्या धार जिल्ह्यातील भोजशाळा  (Dhar Bhojshala Dispute) येथील विवादित स्मारकाची कालबद्ध ‘वैज्ञानिक तपासणी’ करण्यास सांगितले होते. तसे निर्देश देण्याची मागणी केली होती. हे वाग्देवीचे मंदिर असल्याचा दावा केला जात होता. न्यायालयाचे जीपीआर-जीपीएस सर्वेक्षणाचे निर्देश दिले. यानुसार विवादित भोजशाळा मंदिर असल्याच्या ठिकाणी कमल मौला मस्जिदच्या बांधकामाचे जीपीआर-जीपीएस सर्वेक्षणाच्या अत्याधुनिक पद्धतीने सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. या सर्वेक्षणामध्ये शास्त्रीय तपासणी, सर्वेक्षण व उत्खनन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जागेच्या वरच्या आणि खाली असलेल्या विविध वस्तूंचे आयुर्मान याची खातरजमा करण्यासाठी कार्बन डेटिंग पद्धतीचा अवलंब करून सविस्तर शास्त्रीय तपास करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. अहवालानंतर येथे (Dhar Bhojshala Dispute) हिंदूंना पूजा करण्याच्या अधिकाराविषयी विचार केला जाईल. न्यायालयाने या आदेशात नमूद केले आहे की, तज्ज्ञ समितीकडून वरील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच विवादित जागेत पूजा आणि विधी करण्याचा अधिकार विचारात घेतला जाईल आणि निश्चित केला जाईल. ASI च्या 5 सदस्यीय समितीनुसार,विवादित जागेवर निर्माण झालेल्या वक्फच्या वैधतेशी संबंधित समस्या; रिट प्रक्रियेत दिलासा देण्याचा मुद्दा किंवा याचिकाकर्त्यांना दिवाणी दाव्याकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा पाच जणांकडून अहवाल मिळाल्यानंतर निश्चित केला जाईल आणि निर्णय घेतला जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.