Dharavi Assembly Constituency : घराणेशाहीसाठी गायकवाड रडल्या, माझी धारावी मला द्या!

220
Dharavi Assembly Constituency : घराणेशाहीसाठी गायकवाड रडल्या, माझी धारावी मला द्या!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

धारावी विधानसभेच्या आमदार प्रा. वर्षा गायकवाड खासदार बनल्याने धारावी विधानसभेतून आपली बहीण ज्योती गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी त्या प्रयत्नशील आहेत. मात्र, गायकवाड यांच्या बहिणीला धारावीतून प्रचंड विरोध असून काँग्रेस हायकमांड त्यांचे ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे वर्षा गायकवाड या दिल्ली पुढे बहिणीच्या तिकीटासाठी रडल्या. सर्वांची विनवणी केली. परंतु त्यांच्या घरात तिकीट देण्यास दिल्लीचे हायकमांड तयार नसल्याचे काँग्रेसचे संदेश कोंडविलकर, महेंद्र साळवे यांची नावे चर्चेत आहे. त्यामुळे घराणेशाहीसाठी वर्षा गायकवाड दिल्लीत माझी धारावी मला द्या, माझ्या बहिणीला द्या, माझ्या वडिलांचा तो मतदारसंघ आहे, तो दुसऱ्याला कुणाला देऊ नका अशा शब्दात रडत त्यांनी विनवणी केल्याचे बोलले जात आहे. (Dharavi Assembly Constituency)

(हेही वाचा – झारखंडमधील जागावाटपावरुन I.N.D.I. Alliance मध्ये फूट; राजद स्वतंत्रपणे लढण्याच्या पवित्र्यात)

धारावी विधानसभा ही एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाने ओळखली जात आहे. सन २००४ पासून सलग चार वेळा वर्षा गायकवाड निवडून येत आहेत. त्यापूर्वी एकनाथ गायकवाड हे निवडून येत असत. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या पराभव करत वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. वर्षा गायकवाड या खासदार बनल्याने त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. मात्र गायकवाड यांनी खासदार बनल्यानंतर धारावी विधानसभा क्षेत्रात आपली बहीण ज्योती गायकवाड यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार त्यांना सक्रिय राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्योती गायकवाड यांना अचानकपणे राजकारणात आणून त्यांना आगामी विधानसभेत उमेदवारी देण्याच्या प्रयत्न सुरू असल्याने याला तीव्र विरोध स्थानिक काँग्रेसच्या पातळीवर होत आहे. स्थानिक काँग्रेसने ज्योती गायकवाड यांच्या उमेदवाराला स्पष्ट विरोध केला आहे. मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार निश्चिती करण्यासाठी नेमलेल्या समितीने ही ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी शिफारस दिल्लीत केल्याची माहिती मिळत आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या बहिणीला उमेदवारी देण्यासाठी केल्याची माहिती मिळाल्यानंतर या समितीने आपले पत्र दिल्ली हायकमांडला पाठवले होते. (Dharavi Assembly Constituency)

(हेही वाचा – Jammu and Kashmir मध्ये नवी दहशतवादी संघटना सक्रिय! TLM करतेय दहशतवाद्यांची भरती)

त्यामुळेच या मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी संदेश कोंडविलकर यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. तसेच या मतदारसंघातून महेंद्र साळवे आदी इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळेच गायकवाड यांना आपल्या बहिणीला उमेदवारी मिळवून देण्यात मोठा अडथळा विभागातूनच निर्माण झाला आहे. धारावी विधानसभेतून गायकवाड यांचा भाऊ निवडणूक रिंगणात उतरेल असे बोलले जात होते. पण पुढे वर्षा गायकवाड यांनी आपल्या बहिणीचे नाव पुढे रेटत त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली. दरम्यान, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असल्याने या ठिकाणी खंदारे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेतून तिकीट मिळेल म्हणून मनोहर रायबागे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला होता. परंतु रायबागे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी आता बसपा मधून उमेदवारी मिळवण्याची जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने आशिष मोरे आणि त्या आधी माजी आमदार बाबुराव माने यांनी निवडणूक लढवली होती. (Dharavi Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.