धारावीतील (Dharavi) ९० फुटी रोडजवळ एक मेहबुबे सुभानिया मशिद (Mehbube Subhania Masjid) आहे. या मिशिदीचा काही भाग अवैध असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचं पथक हा अवैध भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. बीएमसीचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. तसेच बीएमसी गाडीच्या काचाही फोडल्या.
(हेही वाचा-Cidco: हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार! सिडकोने दिली आनंदाची बातमी)
काही नागरिक रस्त्यावर बसले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. लोक धारावीतील (Dharavi) रस्ता अडवून बसले आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस लोकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे धारावीत (Dharavi) सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे.
मशिदीकडुन जास्तीत जास्त स्थानिकांनी जमण्याचे आवाहन (Dharavi)
वरील पत्रातुन असे दिसुन येते की, बीएमसीची नोटीस येताच मेहबुबे सुभानिया मशिदीकडुन जास्तीत जास्त स्थानिकांनी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. अवैधरित्या मशिद बांधली गेली होती. नोटीस येताच मशिद वाचवण्यासाठी लोकांचा जमाव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बीएमसी पोलिस प्रोटेक्शनसहित येणार असल्याने सकाळी ९च्या आधी सर्वांनी जमावे, असे सांगण्यात आले होते.
मुख्यमंत्रीजी के आश्वासन के बावजूद आज @mybmc ने तोडक कार्यवाही शुरू करने के लिए बुलडोजर भेजे हैं। धारावी में लोगों की भावनाएं आहत न हो, इसलिए मुख्यमंत्री से हमने कल देर रात कार्यवाही पर रोक लगाने के लिए अनुरोध किया था।
मैं फिर एक बार मुख्यमंत्री @mieknathshinde जी से और @mybmc… https://t.co/rklM46RVCs
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 21, 2024
20 सप्टेंबर रोजी खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील मशिदीच्या संबंधित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात धारावीतील हिमालया हॉटेल जवळची मेहबुबे सुभानिया मशिदवरील तोडक कारवाई करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने पाठवली आहे. सदरची मशिद ही अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. धारावी पुनर्वसन प्राधिकरण (DRP) कडून या मशिदीच्या अतिक्रमणाबाबतची चौकशी करावी, सदरहू मशिदीच्या अतिक्रमणाबाबतचा DRP चा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर पुढील निर्णय घेता येईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणचा मुद्दा उपस्थित करून तोडक कारवाई करण्याची नोटीस पाठवलेली आहे. DRP चा चौकशी अहवाल येईपर्यंत राज्याचे प्रमुख या नात्याने आपण मुंबई महानगरपालिकेच्या या तोडक कारवाईला स्थगिती दयावी, अशी विनंती वर्षा गायकवाड यांनी पत्राद्वारे एकनाथ शिंदेंना केली होती. (Dharavi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community