Dharavi shivsena UBT,Congress protest: धारावीकरांना घाबरवून नेले मोर्चाला, उबाठा शिवसेनेचे काँग्रेससह इतर पक्षांवरच धारावीत शक्तीप्रदर्शन

या मोर्चासाठी धारावीतील जनतेला अत्यंत घाबरवून काँग्रेस, उबाठा गट आणि इतर पक्षाने सहभागी होण्यास मजबूर केल्याचे बोलले जात आहे.

212
Dharavi shivsena UBT,Congress protest: धारावीकरांना घाबरवून नेले मोर्चाला, उबाठा शिवसेनेचे काँग्रेससह इतर पक्षांवरच धारावीत शक्तीप्रदर्शन
Dharavi shivsena UBT,Congress protest: धारावीकरांना घाबरवून नेले मोर्चाला, उबाठा शिवसेनेचे काँग्रेससह इतर पक्षांवरच धारावीत शक्तीप्रदर्शन

धारावीच्या पुनर्विकासाचे काम अदानी (Dharavi shivsena UBT,Congress protest) समुहाला देण्यात आल्याने हे काम रद्द करून म्हाडा, सिडको किंवा एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आले. शिवसेनेने सर्व प्रथम हा मोर्चा आपण स्वत: काढणार असल्याचे जाहिर केले होते, परंतु धारावीत शिवसेनेची ताकदच कमी झाल्याने उबाठा गटाला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाची मदत घेऊन मोर्चाला विशाल स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. विशेषत: मुंबईसह आसपासच्या शहरांमधील आमदारांसह त्यांच्या कार्यकत्यांना जमवून ही गर्दी जमावण्यात आल्याचे दिसून आले.

WhatsApp Image 2023 12 16 at 18.46.13

धारावी येथील टी जंक्शनपासून सुरु झालेल्या या मोर्चाचे वांद्रे कुर्ला संकुलातील अदानीच्या कार्यालया शजारी परिसरात सभेत रुपांतर झाले. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, माजी मंत्री व आमदार अनिल परब, आदित्य ठाकरे, पक्षाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत, कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

या मोर्चासाठी धारावीतील जनतेला अत्यंत घाबरवून काँग्रेस, उबाठा गट आणि इतर पक्षाने सहभागी होण्यास मजबूर केल्याचे बोलले जात आहे. काही रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पामुळे आमचे घर अपात्र करून तोडले जाणार आहे, त्यामुळे हे घर तुटण्यापासून जर वाचवायचे असेल तर या मोर्चात यावेच लागेल असा आम्हाला निरोप दिला. त्यामुळे प्रत्येक चाळ कमिटी आणि सोसायटीने रहिवाशांना तशा सूचना केल्या आहेत,म्हणून आम्ही या मोर्चात आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर काही कुटीर उद्योग करणाऱ्या रहिवाशांची घरे पात्र असली तरी सध्या तुम्ही वापरत असलेल्या जागेच्या क्षेत्रफळाची जागा मिळणार नसून जर तुम्हाला मोठी जागा हवी असेल तर या र्मोचात सहभागी व्हावे लागेल असे निरोप देण्यात आले, त्यामुळे ही लोकही यात सहभागी झाले. त्यामुळे एकप्रकारे येथील जनतेला तुमची घरे तोडली जातील, मोठी घरे मिळणार नाही अशा प्रकारची भीती निर्माण करून या मोर्चाची गर्दी वाढण्यात आल्याचे चर्चा ऐकायला मिळत होती.

(हेही वाचा – Dilip Walse Patil: इथेनॉल निर्मिती, कांदा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार, दिलीप वळसे पाटील यांची माहिती)

मुळात हा मोर्चा हा केवळ धारावीतील जनते पुरताच होता. तसेच शेवटच्या क्षणाला हा मोर्चा सर्वपक्षिय काढण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात शिवसैनिकांपेक्षा काँग्रेसच्या व इतर पक्षांचे कार्यकर्तेच अधिक होते. त्यातच शिवसेना उबाठाचे आमदार आणि माजी नगरसेवक व पदाधिकारी यांची उपस्थिती वाढवून या मोर्चातील गर्दी वाढण्याचा प्रयत्न झाल्याचेही पहायला मिळाले. एका बाजुला सर्व पक्षीय मोर्चा असताना काँग्रेसचे अस्लम शेख वगळता कुणी नव्हता, पण शिवसेना उबाठा गटाचे सर्वचे आमदार, नेते, उपनेते, युवा सेनेचे पदाधिकारी सर्वच उपस्थित होते. विशेष म्हणजे ही गर्दी जमवण्यासाठी धारावीच्या बाहेरील मुंबईसह ठाणे आणि विरारमधील शिवसैनिकांनीही हजेरी लावल्याचे दिसून आले आहे.

यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज धारावीसाठी या मोर्चात मुंबईत उतरवली आहे, वेळ आली तर महाराष्ट्र उतरवेन अशा इशारा दिला. धारावीकरांना ५०० चौरस फुटांचे घर तिथल्या तिथेच मिळायला हवे. बीडीडीप्रमाणे धारावी विकास करा, अशी मागणी करतानाच सन २०१८मध्ये धारावीबाबत जो निर्णय घेतला त्यामध्ये आम्ही नव्हतोच, ते पाच तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच होते,असाही आरोप त्यांनी केला. भाजप शिवसेना युतीचे सरकार २०१४मध्ये विराजमान झाले होते आणि त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अर्धे मंत्री होते. त्यामुळे त्यावेळी विरोध न करणाऱ्या शिवसेनेने आता ते पाप देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच फोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष व आमदार वर्षा गायकवाड यांनी धारावीचा विकास हवा, पण सर्वच अदानी कंपनी करणार असेल तर आमचा विरोध आहे,असे सांगत अदानीने मुंबईसाठी काय केले अस सवालही त्यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.