Eknath Shinde : ‘धर्मवीर’च्या पहिल्या भागात इच्छेविरोधात काही गोष्टी कराव्या लागल्या; मुख्यमंत्र्यांचा कुणाकडे आहे रोख?

109

धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे’, हा चित्रपट काही लोकांना खटकला. काही लोक सिनेमा बघता बघता उठून गेले. काही लोकांना काही सीन आवडले नाहीत. पण, आता कोणालाही आवडो ना आवडो फूल फायनल ऑथोरेटी आपण आहोत. तेव्हा थोडं घुसमट, इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या. प्रविणलाही आवडल्या नव्हत्या त्या गोष्टी. कलाकार लोक सर्किट असतात, सर्किट म्हणजे मुडी असतात. त्यांना गोड बोलून प्रेमाने सांगावे लागते. काही लोकांना अजिर्ण झाले. पण त्यावर एक वर्षांपूर्वीच गोळी दिली, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. धर्मवीरच्या भाग २च्या चित्रीकरणाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री यांनी हा टोला कुणाला हाणला यावर चर्चा सुरु झाली.

दुसऱ्या भागाचे ९ डिसेंबरपासून चित्रिकरण करण्यात येणार

धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा पहिला भाग तुफान गाजला. अनेक आठवडे हा चित्रपट विविध थिएटरमध्ये हाऊसफुल होता. तसेच, महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने तुफान गल्ला जमावला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. या दुसऱ्या भागाचे ९ डिसेंबरपासून चित्रिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आज ठाण्यात मुहूर्त संपन्न झाला. यावेळी या चित्रपटाचे कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. अगोदरच्या सिनेमाला (धर्मवारी भाग १) १७ ते १८ पारितोषिके मिळाली. प्रसाद ओकला अभिनयाची वेगळी पारितोषिके मिळाली. प्रसादला मानले पाहिजे. प्रवीणने त्याला बरोबर शोधले प्रसादचा दिघेसाहेबांशी कधी संपर्क नव्हता, कधी पाहिलंही नव्हतं. तो अंधारात एकदा समोरून आला, तेव्हा दिघे साहेब आलेत असाच भास झाला. एवढं मन लावून काम केलं त्याने. कोणताही अभिनय करताना जीव ओतून टाकावा लागतो. सर्वस्व अर्पण करावं लागतं. तेव्हा ती भूमिका पूर्ण होते. सिनेमे येतात जातात, पण अभिनय करायचा म्हणून करायचा नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

(हेही वाचा Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानाला भ्रष्टाचाराचा विळखा; अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती; निविदेशिवाय खरेदी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.