राज्यात सध्या विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेले एक वक्तव्य चर्चेत आले. भाजपकडून यावर जोरदार टीका सुरु आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निषेध आंदोलनेदेखील सुरु आहेत. यावर आता खासदार अमोल कोल्हे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
अजित पवारांनी अधिवेशन काळात वक्तव्य केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. स्वराज्यरक्षक मालिक करत असताना, मला जे जाणवले ते मी मांडत आहे. इतिहासाचा तर्कशुद्धीने विचार करायला हवा. छत्रपती शंभुराजे यांनीच लिहिलेला ग्रंथ पाहिला तर त्यात त्यांनी धर्माची उत्तम चिकित्सा केली आहे. त्यांनी त्यावर श्लोक रचला आहे. जबरदस्तीने ज्यांचे धर्मांतरण झाले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुन्हा एकदा हिंदू धर्मात शुद्धीकरण करुन हिंदू धर्मात स्वागत केले होते. संभाजी महाराजांनी नेहमी हा कित्ता गिरवला. जबरदस्तीने आणलेल्या धर्मांतरावर त्यांनी बंदी आणली होती, असे अमोल कोल्हे म्हणाले.
( हेही वाचा: २०२३ वर्षात मोदी सरकारसमोर ५ कायदे बनवण्याचे असणार आव्हान )
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले. धर्मासाठी बलिदान दिले याचा अभ्यास केला तर याचे काही पुरावे आहेत. त्यामध्ये काही इतिहासकारांनी जे काही लिहून ठेवले आहे. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, औरंगजेबाने शंभुराजेंना बंदी केल्यानंतर 2 प्रश्न विचारले होते. स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि औरंगजेबाची कोणती लोक शंभुराजांना शामिल आहेत. असे चारही इतिहासकार नमूद करतात, धर्मांतर करायला त्यांनी नकार दिला याचा कुठेही आधार नाही.
Join Our WhatsApp Community