अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडण्यात आल्या. मॉरिस नोरोन्हा या गुंडाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मात्र मॉरिशने गोळ्या झाडताना फुटेज दिसत नाही. त्यामुळे या दोघांना कुणी तिसऱ्याने सुपारी देऊन गोळ्या मारल्या का, असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत केला.
फेसबुक लाईव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेले नाही. मॉरिस नोरोन्हाला अभिषेक घोसाळकर यांच्यावर सूड उगवायचा होता मग त्याने स्वत:ही आत्महत्या का केली? हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले.
…तर मॉरिशने आत्महत्या का केली?
मॉरिस नोरोन्हा याच्याकडे परवानाधरक शस्त्र नव्हते. त्याने त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्र याच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मॉरिससारख्या गुंडाला अंगरक्षकाची गरज का लागावी? अमरेंद्र मिश्रा याच्या बंदुकीतून नेमक्या कोणी गोळ्या चालवल्या, हा प्रश्न अनुत्तरित आहे. कॅमेऱ्यामागून गोळ्या झाडणारी व्यक्ती मॉरिसच होता हे कशावरुन? हे प्रकरण वरकरणी वाटते तितके सोपे नाही. एकवेळ आपण मान्य करु की, मॉरिसने सूडाच्या भावनेतून घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. मग त्याने स्वत: आत्महत्या का केली, हा प्रश्न आहे. आणखी कोणत्या व्यक्तीला मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली होती का, असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.
सरकार बरखास्त करावे
त्यामुळे आता आम्हाला कुणाकडून आशा वाटत नाही. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडे आशा आहे. न्यायालयाने हे सरकार बरखास्त करावे आणि तातडीने निवडणुका जाहीर कराव्यात, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
Join Our WhatsApp Community