लाडकी बहीण योजना आणून आम्ही चूक केली का? उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सवाल

170
लाडकी बहीण योजना आणून आम्ही चूक केली का? उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सवाल
लाडकी बहीण योजना आणून आम्ही चूक केली का? उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सवाल

लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) आणून आम्ही काही चूक केली का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महिलांना केला आहे. तसेच ही योजना सुरु ठेवायची की, नाही? असाही सवाल त्यांनी केला. शनिवारी, नागपूरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवायची? तुम्ही म्हणताय सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेऊ नका. मी काही कागद घेऊन आलो आहे. मला अतिशय दुःख होत आहे”. बहिनींनो राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून कॉंग्रेसचे () अनिल वडपल्लीवार  (Anil Vadapalliwar) हायकोर्टामध्ये गेले आहेत आणि त्यांनी याचिका दाखल केली आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : “सकाळी उठून कॅमेरासमोर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय…”, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार)

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे नाना पटोले (Nana Patole) यांचे निवडणूक प्रमुख होते. जे विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे (Sunil Kedar) राइट हँड म्हणवले जातात. आज त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सांगितले या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होत आहे. त्यामुळे ही योजना बंद करा. सांगा बंद करायच्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा – Vidhan Sabha Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार? )

आम्हाला या रखीची आण आहे

माझ्या बहिनींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जो पर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टमध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू. आम्हाला या रखीची आण आहे काहीही झाले तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. आम्ही प्रयत्नांची शर्थ करून हायकोर्टात केस लढवू. पण भगिनींनो यांची नियत समजून घ्या, आज कुठे बहीणींच्या खात्यात पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागले. (Devendra Fadnavis)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.