मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राईक! 22 युट्युब चॅनल्स आणि पाकिस्तानी चॅनल्स ब्लाॅक

136

मंत्रालयाने आयटी नियम, 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत, सोमवार 4 एप्रिलला 22 युट्युब चॅनेल्स, 3 ट्विटर अकाऊंट्स, 1 फेसबुक खाते आणि 1 न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ब्लॉक केलेल्या युट्युब चॅनेल्सची एकूण 260 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूअरशिप होती. या चॅनेल्सचा वापर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था या संवेदनशील विषयांवर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी आणि सोशल मीडियावर खोटा प्रचार करण्यासाठी केला जात होता.

म्हणून करण्यात आले चॅनल्स ब्लाॅक

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयटी नियम, 2021 च्या अधिसूचनेनंतर केलेली ही पहिली कारवाई आहे. नुकतेच 18 भारतीय आणि 4 पाकिस्तान आधारित यूट्यूब न्यूज चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले आहेत. भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवर बनावट बातम्या पोस्ट करण्यासाठी अनेक युट्युब चॅनेल्स वापरण्यात आले.

( हेही वाचा: दुसरा धक्का! आणखी एका पदाधिकाऱ्याचा मनसेला रामराम )

भारतविरोधी अजेंडा चालवला जात होता

यापूर्वी जानेवारी महिन्यात मोदी सरकारने 35 युट्यूब चॅनल ब्लाॅक केले होते. 20 जानेवारी रोजी मंत्रालयाला मिळालेल्या माहितीच्या आधारे 35 युट्युब चॅनल्स , 2 ट्विटर अकाउंट ब्लाॅक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही सर्व खाती पाकिस्तानातून चालवली जात होती आणि खोट्या भारतविरोधी बातम्या आणि इतर साहित्य पसरवले जात होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.