26/11 Attack : दिग्विजय सिंह आता कुठे आहेत? समाजमाध्यमांवर विचारला जातोय प्रश्न

98
26/11 Attack : दिग्विजय सिंह आता कुठे आहेत? समाजमाध्यमांवर विचारला जातोय प्रश्न
26/11 Attack : दिग्विजय सिंह आता कुठे आहेत? समाजमाध्यमांवर विचारला जातोय प्रश्न

२६\११ हल्ल्याचा (26/11 Attack) मास्टरमाईंड तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला अखेर भारतात आणण्यात आले आहे. त्यानंतर श्रेयवादावरून वाद निर्माण झालेले असताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे जुने विधान पुन्हा चर्चेत आले आहे. काँग्रेस नेते यांनी २६\११ हल्ल्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. दरम्यान दि. ३ एप्रिल रोजी राज्यसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान, सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी कोणाचेही नाव घेता म्हटले की, २६/११ च्या हल्ल्यात संघाचे नाव घेतलेली व्यक्ती सभागृहात बसलेली आहे. त्यावेळी दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) अस्वस्थ झाले होते.

( हेही वाचा : Conversion : शाळेसाठी उपलब्ध केलेल्या जमिनीवर मिशनरी बांधत होती चर्च; धर्मांतरणाचा डाव, गावकरी आक्रमक

मुळात मुंबई हल्ल्याच्या अवघ्या १० दिवसांनंतर, दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी २६/११ हल्ला (26/11 Attack ) हा संघाचा कट होता असे प्रकाशित केलेल्या पुस्तकात लिहले होते. तसेच दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की यात कोणताही पाकिस्तानी दहशतवादी सामील नव्हता, या हल्ल्याचा सूत्रधार अशोक सिंघल (Ashok Singhal) होता आणि संघाच्या लोकांनी २६/११ हल्ला घडवून आणला. २६/११ च्या हल्ल्यासाठी (26/11 Attack ) संपूर्ण जग पाकिस्तानला दोष देत असताना, काँग्रेस पक्षाचे नेते आणि पक्षाच्या जवळचे लोक २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी (26/11 Attack) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरण्यासाठी कट रचण्यात होते. आज, त्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला १७ वर्ष उलटूनही, काँग्रेस पक्षाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांसाठी संघ आणि कथित ‘भगवा दहशतवादाला’ जबाबदार धरण्याचे काम केले.

परंतु याप्रकरणी दि. ४ एप्रिलला राज्यसभेत दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) आणि अमित शाह (Amit Shah) हे आमनेसामने आले. २००२ च्या गुजरात दंगलींच्या जबाबदारीवर दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर वाद सुरू झाला. दुसरीकडे, अमित शहा यांनी यावर केवळ प्रतिक्रिया दिली नाही, तर दिग्विजय सिंह यांना त्यांच्या जुन्या विधानांवर, विशेषतः २६/११ च्या मुंबई हल्ल्यांवरील विधानांवरून दिग्विजय सिंह यांची पुरती कोंडी केली.

अमित शाह म्हणाले की, जेव्हा गुजरात दंगली झाल्या तेव्हा मी गृहमंत्री नव्हतो. दंगलीनंतर १८ महिन्यांनी मी गुजरातमध्ये गृहराज्यमंत्री झालो. दिग्विजय सिंह विकृत पद्धतीने तथ्यांची मांडणी करतात, अशी टीका शाह यांनी केली. यावर दिग्विजय सिंह म्हणाले, मी कधीही असे म्हटले नाही की २६/११ च्या हल्ल्यात (26/11 Attack ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता. तुम्हीच लोक वारंवार याचा उल्लेख करता, असे सिहं म्हणाले. यानंतर शाह म्हणाले, “तुम्ही असे कधीच म्हटले नाही, पण तुमच्या कृती आणि विधानामुळे नेहमीच वाद निर्माण होतो.”

दरम्यान दि. १० एप्रिल रोजी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) भारतात आणण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. आता दिग्विजय सिंह कुठेच याविषयी प्रतिक्रिया देताना दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. तहव्वूर राणासह पाकिस्तान सूत्रधारांना सोडून हिंदूंना जबाबदार धरण्याचे काम आणि तपासात संभ्रम निर्माण करण्याचे काम दिग्विजय सिंह यांनी केले, असे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (26/11 Attack )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.