मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक यांचे छायाचित्र असलेले ट्विट करणे महागात पडले आहे. त्यांच्यावर द्वेष पसरवल्याचा आरोप करत इंदूर शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरु गोलवलकर जी के दलितों पिछड़ों और मुसलमानों के लिए व राष्ट्रीय जल जंगल व ज़मीन पर अधिकार पर क्या विचार थे अवश्य जानिए। @INCIndia @INCMP pic.twitter.com/dIYLrGUHQ3
— digvijaya singh (@digvijaya_28) July 7, 2023
काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘दलित-मागास आणि मुस्लिमांसाठी आणि जल, जंगल आणि जमिनीवरील राष्ट्रीय हक्कांबाबत गोळवलकरांचे विचार काय होते, हे जाणून घेतले पाहिजे.’
(हेही वाचा Muslim : पनवेलमध्ये मुसलमानांकडून कट्टरतेचे प्रदर्शन; रेल्वेस्थानकातच केले नमाज पठण )
काय म्हटले पोस्टमध्ये?
दिग्विजय यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रात लिहिले आहे की, ‘सदाशिवराव गोळवलकर यांनी त्यांच्या ‘वुई अँड अवर नेशनहुड आयडेंटिफाइड’ या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे. जेव्हा जेव्हा सत्ता हातात येते तेव्हा सर्वप्रथम राज्यांतील दोन-तीन विश्वासू श्रीमंतांच्या हाती सरकारी संपत्ती, जमीन आणि जंगले सोपवतात. 95% जनतेला भिकारी बनवा, त्यानंतर सात जन्मही सत्ता हातातून जाणार नाही. या छायाचित्रात गोळवलकर गुरुजींचा हवाला देत त्यांनी 1940 मध्ये म्हटले होते की, ‘मी आयुष्यभर ब्रिटिशांची सेवा करण्यास तयार आहे. पण दलित, मागास आणि मुस्लिम यांना समान अधिकार देणारे स्वातंत्र्य मला नको आहे.
द्वेष भडकावण्याचा आरोप
दिग्विजय यांच्या या ट्विटविरोधात तक्रार नोंदवत तक्रारदाराने त्यांच्यावर समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community