Dinesh Waghmare महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणूक आयुक्त

176
राज्याचे निवडणूक आयुक्त Dinesh Waghmare यांनी स्वीकारला पदभार
राज्याचे निवडणूक आयुक्त Dinesh Waghmare यांनी स्वीकारला पदभार

१९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुक्तीबाबत अधिसूचना सोमवारी जारी केली. त्यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल. (Dinesh Waghmare)

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या नव्या निवडणूक आयुक्ताच्या नावाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी दिनेश वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी ते वैद्यकीय शिक्षण विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. दिनेश वाघमारे यांचा निवृत्तीचा कालावधी जून २०२५ होता, मात्र त्यापूर्वीच त्यांची निवड झाली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये यूपीएस मदान यांच्या निवृत्तीनंतर राज्य निवडणूक आयुक्ताचे पद रिक्त होते. (Dinesh Waghmare)

(हेही वाचा- BMC : बुडत्यांना वाचवणाऱ्या नौदलाच्या पाणबुड्यांनाच महापालिकेचे विमा कवच)

दिनेश वाघमारे यांना प्रशासनात २९ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ऊर्जा विभाग, गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग अशा विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. या पदासाठी माजी मुख्य सचिव नितिन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजीव जलोटा, आणि नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा हे देखील शर्यतीत होते, पण वाघमारे यांनी बाजी मारली. (Dinesh Waghmare)

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, आणि पंचायत निवडणुकीची जबाबदारी राज्य निवडणूक आयुक्तांवर असते. अशा परिस्थितीत दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. (Dinesh Waghmare)

(हेही वाचा- विधानसभेत हिरव्या सापांबरोबर मविआचा बंदोबस्त केला; आमदार Sangram Jagtap यांचा हल्लाबोल)

स्थानिक निवडणुकांमुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग
नवीन राज्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता वाढली आहे. वाघमारे यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Dinesh Waghmare)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.