-
प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगतीने सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची विनंती न्यायालयाला करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, ड्रग्ज (Drugs) प्रकरणात पोलिसाचा थेट संबंध आढळल्यास त्याला निलंबित न करता त्वरित बडतर्फ करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पोलीस परिषदेत सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यांनी सांगितले की, देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केला आहे. तसेच, पूर्ण पुराव्यासह योग्य वेळी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची आधीच नियुक्ती झाली असून, सरकार न्यायालयाला फास्टट्रॅक न्यायालयात प्रकरण चालविण्याची विनंती करणार आहे.
(हेही वाचा – अत्याचाराच्या तक्रारीत महिलेचे म्हणणे तापसाआधी ‘सत्य’ मानू नये; Kerala High Court चे निरीक्षण)
ड्रग्ज प्रकरणात कडक कारवाई
ड्रग्जच्या (Drugs) गैरव्यवहारात पोलिसांचा सहभाग आढळल्यास कोणत्याही पदावर असला तरी संबंधित अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ केले जाईल, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात ड्रग्ज विरोधात ‘झिरो टॉलरन्स’ नीती अवलंबण्यात येणार असून, कठोर कारवाई केली जाईल.
(हेही वाचा – Mumbai University ने स्वतःच्या नावातच केली चूक; मुंबई ऐवजी लिहिले ‘हे’ नाव )
नवीन कायद्यांची अंमलबजावणी व फॉरेन्सिक क्षमता वाढवणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेत सांगितले की, नुकतेच देशभरात तीन नवीन कायदे लागू झाले आहेत. या कायद्यांची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यासंदर्भात विस्तृत सादरीकरण करण्यात आले.
याशिवाय, महासायबर प्लॅटफॉर्मच्या निर्मितीवर, महिला व बालक अत्याचार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर, उद्योजकांना पोलिसांकडून त्रास होणार नाही याची हमी देण्यावर तसेच फॉरेन्सिक प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्यावर चर्चा झाली.
(हेही वाचा – Prayagraj मधील मुस्लिमबहूल वस्तीत गोवंशाचे कापलेले धड आणि इतर अवशेष धर्मांधांनी हिंदूंच्या घराबाहेर फेकले)
गुन्ह्यातील जप्त माल तातडीने परत देणार
फडणवीस यांनी अजून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करत सांगितले की, गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला मुदतेमाल संबंधित मालकाला तातडीने परत करण्यात येईल. यामुळे न्यायप्रक्रियेत पारदर्शकता येईल व नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Drugs)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community