आत्म्याविना शरीर, इंजिनविना गाडी आणि अर्थविना संकल्प! १ मे १९६० नंतर प्रथमच राज्याचे दरडोई उत्पन्न १३ हजार ३४६ रुपयाने कमी झाले आहे. शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळे, शोषित यांना एक रुपयादेखील विशेष पॅकेजच्या माध्यमातून सरकारने दिला नाही. श्रीक्षेत्रांसाठी तरतूद सांगितली, पण प्रत्यक्षात आकडा सांगितला नाही. महिला दिनी महिला स्वावलंबी व्हाव्यात, अशी अपेक्षा होती, पण कोरोना काळात बिल्डरांना मुद्रांक शुल्कात ३ टक्के सूट देणाऱ्या सरकारने आई-बहिणीची थट्टा करत मात्र १ टक्का सूट मुद्रांक शुल्कात देत सिद्ध केले कि, ‘खोदा पहाड निकला चुहे का चित्र’!, अशी टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
(हेही वाचा : अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही, अजित दादा विरोधकांवर भडकले)