- प्रतिनिधी
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी लोकसभेत प्रश्नांना उत्तर देताना धक्कादायक आकडेवारी संसदेत सादर केली. रेल्वे मंत्री म्हणाले की, रेल्वे दरवर्षी तिकिटांवर 56,993 कोटी रुपयांची सबसिडी देते. तसेच रॅपिड ट्रेनच्या प्रश्नावर ते म्हणाले की, भुज ते अहमदाबाद दरम्यान नमो भारत रॅपिड रेल्वे चालवली जात आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले की, ‘जर तिकिटाची खरी किंमत १०० रुपये असेल, तर रेल्वे ते तिकीट केवळ ५४ रुपयांना उपलब्ध करून देते. अशा प्रकारे, प्रत्येक प्रवाशाला प्रत्येक तिकिटावर सुमारे 46 टक्के सवलत दिली जाते.
(हेही वाचा – Sachin – Vinod Reunite : आचरेकर सरांच्या निमित्ताने सचिन आणि विनोद जेव्हा पुन्हा एकाच व्यासपीठावर येतात)
प्रश्न वेळेत दिलेले उत्तर
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खासदारांनी रेल्वे तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतीबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा रेल्वेमंत्री (Ashwini Vaishnaw) उत्तर देण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले की, रेल्वे प्रत्येक श्रेणीतील प्रवाशांना दरवर्षी 56,993 कोटी रुपयांची सबसिडी देते.
(हेही वाचा – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आमच्यासाठी तांत्रिक व्यवस्था; Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका)
हे अंतर ५ तासात कापले जाते
भुज आणि अहमदाबादमधील अंतर सुमारे 359 किलोमीटर आहे. नमो भारत रॅपिड रेल्वे हे अंतर अवघ्या ५ तास ४५ मिनिटांत पूर्ण करते. या मार्गात अनेक थांबे आहेत, परंतु असे असूनही नमो भारत रॅपिड रेलने या दोन शहरांची जोडणी अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण केली आहे.
(हेही वाचा – Accident News : शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा अपघात!)
महत्त्वाचे मुद्दे :
1. एका तिकिटावर 46 टक्के सूट मिळते.
2. रेल्वेमंत्र्यांनी (Ashwini Vaishnaw) लोकसभेत तिकीटाची आकडेवारी सादर केली.
3. दरवर्षी 56,993 कोटी रुपयांची सबसिडी उपलब्ध आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community