मधल्या काळात सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवून एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. मुळात आम्ही अनेकदा याबाबत भूमिका मांडली आहे. ज्यावेळी विधानसभेत मराठा आरक्षणासंतर्भातले विधेयक मांडण्यात आले, तेव्हाही आम्ही त्याला पाठिंबा दिला होता. आमचे म्हणणे इतकेच आहे, आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावे आणि सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) त्याला पाठिंबा असेल, असे मत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मांडले.
(हेही वाचा Karnataka Congress : सरकारी योजनांच्या नावाखाली कर्नाटकात काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना देणार भरघोस पगार)
नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ज्यावेळी काही मराठा आंदोलक मला भेटायला आले, तेव्हा मी त्यांना हेच सांगितले, की दोन समाजाला एकमेकांविरोधात लढवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एकाच आईची मुले आहोत, महाराष्ट्राची लेकरे आहोत. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी एकत्र या, त्यासाठी शिवसेनेचे काही सहकार्य लागत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही. यापूर्वी बिहार सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, न्यायालयाने ते रद्द केले. कारण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार हे लोकसभेला आहेत. त्यामुळे सर्व समाजाच्या नेत्यांना पंतप्रधान मोदींकडे जावे लागेल, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
Join Our WhatsApp Community