संभाजीराजे मविआकडून अर्ज भरण्यास इच्छुक, पण मुख्यमंत्री म्हणतात…

117

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचं माजी खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेकडून त्यांची कोंडी करण्यात आली. यानंतर आता संभाजीराजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर भेट झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यास सांगितले. पण संभाजीराजे यांनी यास नकार दिला असून, आपण महाविकास आघाडीकडून अर्ज भरण्यास इच्छुक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचाःआदित्य ठाकरे म्हणतात, आता बाळासाहेब हवे होते )

संभाजीराजे यांनी घेतली भेट

संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गुरुवारी संध्याकाळी भेट झाली, 25 मिनिटे चाललेल्या या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्यापुढे शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव ठेवला. पण या प्रस्तावात बदल करण्यास संभाजीराजे यांनी सुचवले. शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीकडून हा अर्ज भरण्यास आपण इच्छुक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः ‘मनसे’चं ठरलं! पुण्यात ‘या’ तारखेला होणार राज ठाकरेंची सभा)

या प्रस्तावावर विचार करुन काही दिवसांत आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना सांगितले असल्याचेही सूत्रांकडून समजत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.