गिरीश बापट यांचा वारस कोण? भाजपमधून ५ तर काँग्रेसमधून २ जणांची नाव चर्चेत

76

खासदार गिरीश बापट यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता गिरीश बापट यांचा वारस कोण? अशी चर्चा पुण्यात रंगली आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक लॉबिंग भाजपमध्येच सुरू असल्याचे दिसून येत आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेत आहेत. त्यामध्ये माजी खासदारांचाही समावेश आहे. तर बापट यांच्या सूनेच्या नावाचीही चर्चा आहे. तर काँग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे.

(हेही वाचा – फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, ‘मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबतही नाही’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.