Cabinet Meeting : राज्यमंत्रीमंडळ बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाच्या लाभांवर चर्चा

35
Cabinet Meeting : राज्यमंत्रीमंडळ बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाच्या लाभांवर चर्चा
Cabinet Meeting : राज्यमंत्रीमंडळ बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाच्या लाभांवर चर्चा

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमधून महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, यावर राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) सविस्तर सादरीकरण करण्यात आले. विविध विभागांच्या सचिवांनी एक तासभर सादरीकरण करून केंद्र सरकारच्या (Central Govt) योजनांचा लाभ घेण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत आरोग्य, शिक्षण आणि महिलांसाठी असलेल्या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले. जलजीवन मिशन, PM स्वानिधी, जिल्हास्तरीय कर्करोग उपचार केंद्रे, भारतनेट योजना, शेतकरी कल्याण, अमृत योजना अशा महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या योजनांचा राज्याला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. (Cabinet Meeting)

(हेही वाचा – MahaKumbh 2025 : अमृतस्नानासाठी १५ फेब्रुवारीनंतर या; प्रचंड गर्दीमुळे प्रयागराज प्रशासनाचे भाविकांना आवाहन)

रेल्वे आणि इतर योजनांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत

यंदा रेल्वेसाठी विक्रमी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करून पाठवावेत, असे निर्देश मंत्रिमंडळाने संबंधित विभागांना दिले.

केंद्र सरकारच्या (Central Govt) विविध योजनांमध्ये महाराष्ट्राने अधिक सक्रिय सहभाग घ्यावा आणि उद्योग, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला कल्याण यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणावा, अशी भूमिका मंत्रिमंडळाने मांडली. या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीचे विश्लेषण करून तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, असेही ठळक निर्देश देण्यात आले. (Cabinet Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.