Chhagan Bhujbal आणि शरद पवार भेटीच्या चर्चांना उधाण; स्वगृही परतणार?

64
Chhagan Bhujbal आणि शरद पवार भेटीच्या चर्चांना उधाण; स्वगृही परतणार?
Chhagan Bhujbal आणि शरद पवार भेटीच्या चर्चांना उधाण; स्वगृही परतणार?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळ शरद पवार गटात स्वगृही परतणार असल्याच्या अटकळींना यामुळे जोर मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्याने ते सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्याला भेट देण्याच्या कार्यक्रमात भुजबळांनी फुले स्मारकाच्या कामाबाबत सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीवर टीका करत उपोषणाचा इशारा दिला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी, “भुजबळांना उपोषणाची वेळ येणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, भुजबळांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) “दैवत” संबोधल्याबाबत बोलताना, “शरद पवार (Sharad Pawar) माझ्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत,” असे सांगून सर्वांचे लक्ष वेधले.

(हेही वाचा – आता शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही ; CM Devendra Fadnavis यांची अमित शाहांसमोर मोठी मागणी)

सूत्रांनुसार, भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यातही भेट झाली असून, यावेळी भुजबळांनी महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्यावरील दोन पुस्तके शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी भेट दिली. या भेटीमुळे भुजबळ शरद पवार गटात परतण्याच्या शक्यतांवर चर्चा तीव्र झाली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, भुजबळांची नाराजी आणि शरद पवारांबद्दलचा आदर यामुळे पक्षांतराच्या अटकळांना बळ मिळत आहे. मात्र, भुजबळांनी याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. येत्या काळात त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.