मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. शिवसेना आणि भाजपमधून सध्या विस्तवही जात नाही. असे असताना उद्धव ठाकरेंनी युतीच्या चर्चांना हवा दिल्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. शिवसेना आमदार आणि महसूल मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मिले सूर मेरा तुम्हारा म्हणत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
काय म्हणाले दानवे-सत्तार?
जनेतेने शिवसेना-भाजप युतीला विधानसभा निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामुळे पुन्हा जर का युती झाली तर दोन्ही पक्षांच्या मतदारांना नक्कीच आनंद होईल, असे दानवे यावेळी म्हणाले. तर पुढील तीन वर्षांसाठी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची देखील युतीसाठी तयारी आहे, असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अंतिम असेल, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः व्यासपीठावर आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी! मुख्यमंत्र्यांची भाजपाला ऑफर)
एकनाथ शिंदेंकडूनही युतीचे संकेत
यानंतर शिवसेनेचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, मुखमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर ते पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचा आदेश हा पक्षाचा आदेश आहे. त्यामुळे राजकरणात काहीही होऊ शकते, हे सत्य आहे, असेही शिंदे म्हणाले.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे. मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
(हेही वाचाः तर तुला सोडणार नाही… गडकरी कंत्राटदाराला काय म्हणाले होते? वाचा किस्सा)
राजकारणात काहीही होऊ शकतो
राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. ते २५ वर्षे आमच्यासोबत होते. त्यामुळे काही वेळ जाऊ द्यावा, सर्व सुरळीत होईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Join Our WhatsApp Community