Sushma Andhare : सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत देवयानी फरांदे आक्रमक

उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर देवयानी फरांदे यांनी त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.

300
Sushma Andhare : सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत देवयानी फरांदे आक्रमक
Sushma Andhare : सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत देवयानी फरांदे आक्रमक

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर राज्यातील मोठे ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपाच्या नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांच्यावर अनेक आरोप केले.

(हेही वाचा – Goa Liberation Day : गोमंतक मुक्तीच्या वेळची राजकीय आणि सामाजिक स्थिती !)

सुषमा अंधारे यांच्याकडून होणाऱ्या आरोपांविषयी विधानसभेत चर्चा

सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवर काही दिवसांपूर्वी फरांदे यांनी विधानसभेत (maharashtra assembly winter session) माहिती दिली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांना त्यांच्याकडे असलेल्या आयुधांचा वापर करून कारवाई करण्यास सांगितले होते. आमदार देवयानी फरांदे यांनी याची दखल घेऊन सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव (Proposition of Infringement) मांडला.

अंधारे यांनी गृहमंत्र्यांना पुरावे द्यावे

एका निनावी पत्राचा हवाला देत Sushma Andhare यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत फरांदेंवर आरोप केले होते. त्यावरून आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, ”सुषमा अंधारे या गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या असतील परंतु त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या निनावी पत्रावरून पुण्यात माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. मी गेली ३० वर्षे राजकारणात विविध पदांवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतेय. मी आजपर्यंत कुणावरही पुरावा नसताना आरोप केला नाही. या ताईंकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावे. मी सातत्याने ड्रग्सविरोधात लढा देतेय. नाशिकला ड्रग्समुक्त करण्यासाठी लढत आहे. माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले.”

(हेही वाचा – Indigo Airlines : इंडिगो एअरलाईन्सचा नवीन प्रवासी विक्रम, एका वर्षांत १० कोटी प्रवाशांनी केला प्रवास)

विधानसभा अध्यक्षांचे आश्वासन

ललित पाटील (Lalit Patil) हे उबाठा सेनेचे असल्याने माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. याबाबत सुषमा अंधारेंवर पुराव्यासह विधानसभेत हक्कभंग (Proposition of Infringement) दाखल करावा, अशी मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी ‘माझ्याकडे तुम्ही प्रस्ताव सादर करा. मी तपासून उचित निर्णय घेईन’ असे आश्वासन दिले, असे आमदार देवयानी फरांदे यांनी माध्यमांना सांगितले.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी (maharashtra assembly winter session) मला निनावी पत्र प्राप्त झाले. ते मी पुणे पोलिसांना दिले आहे. पत्रात जे संदर्भ दिले आहेत, त्यात कुठलाही पुरावा नाही. या पत्रात छोटी भाभी उर्फ शेख याला अटक केली तर बडी भाभी कोण ? असा म्हणत Sushma Andhare यांनी अप्रत्यक्षपणे देवयानी फरांदे यांच्याकडे बोट दाखवले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.