पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अडून बसलेल्या अजित पवारांनी नाराजीचा सूर आळवल्यानंतर भाजपाला नाईलाजास्तव माघार घ्यावी लागली. चंद्रकांत पाटलांना हटवून पवारांना पुण्याची मनसबदारी पवारांना देण्यात आली. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयावर भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्ष समर्थक प्रचंड नाराज असून, आगामी निवडणुकांमध्ये थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काहींनी सोशल मीडियावर यासंदर्भात व्यक्त होत, मतदानाच्या दिवशी फिरायला जाऊ, पण चुकीच्या लोकांना निवडून देणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. (Ajit Pawar)
या सर्वांमध्ये पुण्यातील भाजपाचे समर्थक चेतन दीक्षित यांची पोस्ट बोलकी आहे. ते लिहितात, जेवढे लाड अजित पवारांचे काकांनी केले नसतील तेवढे फडणवीसांनी चालवले आहेत की काय? अशी शंका यावी असे तमाशे राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. मी भाजपसमर्थक असलो, तरी गुलाम नाही. जे पटत नाही ते बोलणारच. आता जे काही लिहितोय ते पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांशी बोलून लिहितोय. ते भयंकर अस्वस्थ आहेत. (Ajit Pawar)
पुण्यासाठी १ हजार १०० कोटी मंजूर झालेले अजित पवारांनी थांबवले. अजित पवारांना पुणं-पिंपरी चिंचवड किती आवडतं हे जगजाहीर आहे. जेव्हा ते सत्तेत आले तेव्हाच चर्चा सुरु झाली होती की पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळणार. पण, आतलं मन म्हणत होतं फडणवीस असं होऊ देणार नाहीत. फडणवीसांच्या मनाचा अंदाज लावता येणार नाही अशा चुकीच्या भ्रमात होतो मी. दुर्दैवानं तसंच झालं. (Ajit Pawar
रक्ताचं पाणी करून ज्या भाजप कार्यकर्त्यांनी जो जिल्हा बांधला त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून अजितदादांना पुणे जिल्हा आंदण म्हणून दिला गेलाय. फडणवीसांची अशी काय मजबुरी होती देव जाणे! हक्काचा मतदारसंघ माती खाऊन कसा घालवायचा याचा वस्तुपाठ कसब्याने घालून दिला असताना अख्खं पुणं अजित पवारांच्या खिश्यात घालून फडणवीसांनी नेमकं काय साधलं? बारामतीची जागा? (Ajit Pawar)
२ महानगरपालिका, १३ नगरपालिका, ७५ जिल्हापरिषद मतदारसंघ, १ हजार ५०० ग्रामपंचायती, २१ आमदार आणि ४ खासदार एवढा भरगच्च पुणे जिल्हा अजित पवारांच्या दावणीला बांधून फडणवीसांनी कोणता बाण मारलाय हे माझ्या अल्पबुद्धीला अजिबात समजलेलं नाही. इथेही मास्टरस्ट्रोक शोधणाऱ्यांना मी आधीच शुभेच्छा देतो, असा टोलाही चेतन दीक्षित यांनी लगावला आहे. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Tomato Rate : टोमॅटोचा पुन्हा चिखल; शेतकऱ्यांचा तीव्र संताप)
भाजप कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश करावा…
- पुण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश करावा… अस्तंगत होऊ पाहणाऱ्या पक्षाला बोकांडी घेऊन फडणवीसांना अजित पवारांनी मात दिली हेच जाहीर होत नाही? (Ajit Pawar)
- राजकारणात बारीकसारीक गोष्टींवरून रुसणाऱ्या नेत्याच्या आहारी फडणवीस कसे काय गेले? मविआ असताना हसन मुश्रीफांना कोल्हापूर मिळालं नव्हतं ते भाजप सत्तेत असताना मिळतंय. (Ajit Pawar)
- पुण्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादांनी असं काय केलं कि त्यांना सोलापूर आणि अमरावती ह्या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली? (Ajit Pawar)
- अजित पवार सत्तेत येणे ही पवारांची भूक होती. भाजपची गरज नव्हती. नेमकं कोण डिमांडिंग पोजिशन मध्ये आहे, हेच कळेना झालंय मुळात. (Ajit Pawar)
- सॉरी फडणवीस सॉरी.. ही भयंकर मोठी दुर्घटना आहे.. आता वाट पाहतोय कधी थोरले पवार भाजपात येताहेत याची. हा माझ्या नजरेतला भाजप नाहीच! (Ajit Pawar)
- मुळात हा भाजपच नाही. हा भयंकर आत्मघातकी निर्णय आहे. ज्यांनी ज्यांनी तन मन धन अर्पून पक्षाची निरपेक्ष भावाने सेवा केली, ते हे सहन करणार नाहीत. भयंकर किंमत फेडावी लागेल. घाणीत कमळ उगवतं शेठ… कमळात घाण नाही, अशा शब्दांत चेतन दीक्षित यांनी भाजपा श्रेष्ठींच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community