Disha Salian च्या संशयित मृत्यूच्या प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवार, २ एप्रिलला हे प्रकरण सुनावणीसाठी आले, पण यावर सुनावणी होऊ शकली नाही, आता यावर सुनावणीसाठी पुढील तारीख मिळणार आहे. जर न्यायालयाने लांबची तारीख दिली तर ती जवळची द्यावी अशी मागणी सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा करणार न्यायालयाकडे करणार आहेत.
सुनावणीनंतर निलेश ओझा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, दिशा सालियनचे (Disha Salian) वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. दिशा सालियानचे (Disha Salian) वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी उच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या प्रकरणाची सुनावणी चुकून न्यायमूर्ती डेरे व न्यायमूर्ती रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर लावण्यात आली होती.
(हेही वाचा Waqf Amendment Bill :…तर संसद भवन देखील वक्फने काबीज केले असते; मंत्री किरण रिजिजू काय म्हणाले?)
न्यायालयात नमूद केले की, हा खटला तुमच्याकडे नाही. महिलेविरोधातील गुन्ह्याचे हे प्रकरण न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे जायला पाहिजे. आता सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होईल. न्यायालयाने या खटल्याच्या नोंदीस परवानगी दिली आहे. खटल्याची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. न्यायालयाने खूप लांबची तारीख दिली तर आम्ही लवकर सुनावणी व्हावी यासाठी विनंती करू, असे निलेश ओझा यांनी सांगितले. पोलिसांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट बोगस होता, असा दावा करत पोलिसांनी हा रिपोर्ट परत घेत याप्रकरणी तपास सुरू केला असल्याचे ओझा यांनी सांगितले. (Disha Salian)
Join Our WhatsApp Community