दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत होणार चौकशी, फडणवीसांची विधानसभेत घोषणा

236

हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात एकच गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झाडल्या गेल्यात. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोण होतं, याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे आणि भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान, विधानसभेतील सभागृहातील झालेल्या प्रचंड झालेल्या गदारोळानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.

काय केली फडणवीसांनी घोषणा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची अखेर एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. फडणवीस यांच्या या घोषणेनंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अडचणीत येऊ शकतात. इतकेच नाहीतर आदित्य ठाकरेंची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या ही केस पोलिसांकडे असून कोणाकडे यासंदर्भातील काही पुरावे असतील तर ते द्यावेत. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग राजपूत यांची केस सीबीआयकडे होती. असे नवीन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल, असेही फडणवीसांनी सांगितले.

(हेही वाचा – दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत पडसाद; गोंधळामुळे सभागृहातील कामकाज चौथ्यांदा तहकूब)

दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण भरत गोगावले आणि नितेश राणेंनी उपस्थित केले. दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर न येणे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी, अशी मागणी गोगावले आणि नितेश राणेंनी केली. दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या रात्री तिथे कोणता मंत्री हजर होता, असा सवाल करत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.