सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेंजर दिशा सालियन (Disha Salian) हिचा पाच वर्षांपूर्वीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालात दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा असून शरीरावर गंभीर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दिशा सालियनचा (Disha Salian) मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होते, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दिशाच्या वडिलांची नव्याने याचिका
दिशा सालियनचे (Disha Salian) वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत या प्रकरणी नव्याने याचिका दाखल केली आहे. सामुदायिक बलात्कार केल्यानंतर दिशाची हत्या करण्यात आली आहे असा आरोप सतीश सालियन यांनी त्यांच्या याचिकेतून केला आहे. दिशाचे पोस्टमॉर्टम हे पाच वर्षांपूर्वी करण्यात आले असून ते राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community