दिशा सालियन प्रकरण; अब्रुनुकसानीसाठी आदित्य ठाकरे न्यायालयात जाणार नाहीत, कारण…

140

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी उबाठा चे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. आघाडीचं सरकार असताना सोशल मीडियावर या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. तेव्हा आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले गेले. तोपर्यंत कोणत्याही नेत्याने त्यांचे नाव उच्चारले नव्हते. नंतर मात्र राणे कुटुंबाकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आला.

त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून तत्कालीन विरोधी पक्षाने फारसं लक्ष दिलं नाही. कारण त्याचा फारसा फायदाही होणार नव्हता. म्हणून त्यांनी वेट ऍंड वॉच या तत्वाचं अनुसरण केलं. तरी सुशांतच्या प्रकरणात सीबीआयची एंट्री झाली. तेव्हादेखील आघाडीचं वागणं संशयास्पद वाटलं. सीबीआयला क्वारंटाइन करण्याची भाषा करण्यात आली. पण आता सरकार बदललं आहे. हे खूनाचं प्रकरण असलं तरी यात आता पुरावे मिटवले गेले असणार. त्यामुळे नव्याने काही सापडेल याची शक्यता कमीच आहे.

आता यात एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. मुंबईमधील कूपर रुग्णालयात मॉर्चरीमधील कर्मचारी रुपकुमार शाह यानं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दावा केला आहे की, ” जेव्हा सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह पाहिला तेव्हा मला आत्महत्या केली नसल्याचं वाटलं. त्यांच्या शरिरावर दुखापतीचे व्रण होते. मी ही बाब माझ्या सिनिअरला सांगितली. मात्र यावर आपण पुन्हा चर्चा करुयात.” असे म्हटल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

महत्वाचं म्हणजे सुशांतचं पोस्टमॉर्टम झालं तेव्हा शाह स्वतः उपस्थित होते. “जेव्हा सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह पाहिला तेव्हा मला ही आत्महत्या केली नसल्याचं वाटलं. त्यांच्या शरीरावर दुखापतीचे व्रण होते. मी ही बाब माझ्या सिनिअरला सांगितली. मात्र यावर आपण पुन्हा चर्चा करुयात. आत्महत्या केलेल्या मृतदेहाच्या गळ्याला फाशीचा व्रण असतो..त्याला हँगिंग मार्क म्हटलं जातं… पण सुशांतच्या मृतदेहावर असणारा व्रण वेगळाच होता. त्याशिवाय पाय आणि हातावरही वेगवेगळे व्रण होते. याबाबत आता मी आणखी सविस्तर बोलू शकत नाही.” असंही शाह म्हणाले आहेत.

आता हळूहळू आणखी काही खळबळजनक गोष्टी समोर येणार आहेत. अर्थात समजा हा खून आहे असं समजलं तरी यातील हाय प्रोफाइल चेहर्‍यांना शिक्षा होईलच असे नव्हे. परंतु जनतेच्या दरबारात मात्र त्यांना शिक्षा होऊ शकते. आता आदित्य ठाकरे यांच्यावर होणार्‍या सततच्या आरोपांमुळे आदित्य हे न्यायालयात दाद मागण्याचा विचार करत असल्याचे वृत्त वाचनात आले. अब्रुनुकसानीचा दावा ठोकता येईल का यावर ते सध्या कायदेशीर सल्ला घेत आहेत. परंतु जेव्हा मविआ चं सरकार होतं तेव्हा देखील ठाकरेंनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला नाही. मग आता ते याचा विचार का करत आहेत हे समजत नाही. मागे दिशा सानियनच्या प्रकरणावरुन सीबीआयने स्टेटमेंट दिल्याचं वृत्त आलं होतं. परंतु दिशाचा तपास सीबीआयकडे नव्हताच. मग ही बातमी कोणी व कोणासाठी पेरली? कोणाला जनतेच्या दरबारात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला? ते आदित्य ठाकरे आहेत का? की आणखी कोण?

( हेही वाचा: महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालयांना सील )

 

समजा आदित्य यांना अब्रुनुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर त्यांनी याआधी का केला नाही. कारण राणे कुटुंबाने त्यांचं नाव घेऊन बर्‍याचदा आरोप केले आहेत? आदित्य ठाकरेंनी आपल्यावर अब्रुनुकसानीचा दावा करावा अशी राणेंची इच्छा आहे का? जेणेकरुन त्यांना वैयक्तिकरित्या या प्रकरणात पक्षकार म्हणून सहभागी होता येईल? नेमकी राणेंची चाल काय आहे? या सर्व गोष्टी पाहता आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा करणार नाहीत. कारण राणेंना न्यायालयात आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल आणि यातून ठाकरेंच्या भूतकाळातील काही गोष्टी देखील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.