ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करा! शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची मागणी

118
ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करा! शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची मागणी
  • प्रतिनिधी

पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केंद्राकडे केली. “मुस्लिम मतांसाठी ममता लाचार झाल्या आहेत. बंगालमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत, त्यांना घरदार सोडून पलायन करावे लागत आहे. ममता हिंदूंना संरक्षण देण्यास अपयशी ठरल्या,” अशी टीका म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली.

(हेही वाचा – CC Road : रस्ते काँक्रिटीकरण कामात हलगर्जीपणा; कंत्राटदाराविरोधात मोठी कारवाई)

म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले, “वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकानंतर मुर्शिदाबादमध्ये विशिष्ट समाजाने हिंदूंवर हल्ले केले. पोलिसांसमोरच हिंदू कुटुंबांना ठार मारले, मालमत्तेची जाळपोळ झाली.” त्यांनी ममतांची तुलना २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाशी करत त्यांचे नाव ‘ममता राणा’ करावे, अशी खरमरीत टीका केली. शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच बंगालमध्ये जाऊन पीडित हिंदूंना मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

(हेही वाचा – Ayushman Bharat Yojana : ४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ)

म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शिवसेना उबाठावरही निशाणा साधला. “हिंदूंवरील अत्याचारावर शिवसेना उबाठा गप्प का? मातोश्रीवर ममता बॅनर्जींना चहाला बोलवणारे उद्धव ठाकरे निषेध करतील का?” असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन यांनीही सोयीस्कर मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. २०१८ मध्ये रामनवमीला राणीगंजात दंगल आणि निवडणुकांदरम्यान हिंसाचाराचा इतिहास सांगत ममता घटनेची मोडतोड करत असल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हस्के म्हणाले, “लोकसभेत लोकांनी खरी शिवसेना कोणाची हे दाखवले. आता एआयने बाळासाहेबांचे भाषण करायची वेळ आली, इतके खचलेले मन आणि खचलेला पक्ष झाला आहे. संजय राऊत जळके लाकूड आहे, त्यांच्यातून धूर येतो.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.