
पक्षातील खदखद वाहिनीवर बोलून दाखवल्यामुळे उबाठा गटाचे नागपूर येथील नेते किशोर तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते होते. शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray, उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्याचे किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त केले आहे. उबाठा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे हे कळवण्यात आले आहे.
(हेही वाचा – २०० कोटींचा आकडा गाठण्यापूर्वी ‘Chhaava’ च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी !)
निवडणुकीच्या वेळी तिकीटविक्री
किशोर तिवारी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर रातोरात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. वृत्तवाहिनीशी बोलतांना किशोर तिवारी म्हणाले की, विधानसभेच्या निकालानंतर चिंतनाची परिस्थिती निर्माण झाली. लोकसभेत वेगळे होते. लोकं सोडून गेली. मला वाटले एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोडून गेलेले लोकं ईडी, सीबीआयमुळे गेले, असे मला वाटले. आमच्याकडे खासदार आणि आमदार यांना निधीची कमी आहे. विधानपरिषदेच्या आमदारकीची शक्यताही कमी आहे. राजन साळवी सोडून गेले, तर आमचे नेता म्हणाले आम्हाला फरक पडत नाही. निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे तिकीटविक्री होते. यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी आहेत.
काही लोकांनी दुकानदारी थाटली
विनायक राऊत (Vinayak Raut), संजय राऊत (Sanjay Raut), मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हो टोल लावून बसले आहेत. अरविंद सावंत यांच्याविषयीही खूप तक्रारी आहेत. पहिली तिकिटे द्यायची, नंतर शिवबंधन बांधायचे, असेही प्रकार झालेले आहेत. पक्षात काही लोकांनी आपली दुकानदारी थाटली आहे, त्यांना हाकलणे गरजेचे आहे. हे उद्धवजींना माहिती आहे; पण ते काय करू शकतात. तीच लोकं पदावर आहेत. अशांची हकालपट्टी होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केली होती.
किशोर तिवारी यांनी विचारले प्रश्न
त्यानंतर पक्षाच्या वतीने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाला गळती लागली आहे. त्यातच पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. याविषयी किशोर तिवारी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘जो माणूस सत्य बोलण्याचे धाडस करतो, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मागील पाच वर्षांपासून सतत राहून भाजपच्या सर्व प्रवक्त्या मंडळींनी त्यांची जागा दाखविणाऱ्या एका चळवळीतील कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हकालपट्टी किती योग्य आहे, हे आपण सांगा’, अशा शब्दांत किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community