Ashwini Bidre Murder प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर दोषी; न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणी ७ डिसेंबर २०१७ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली होती.

150
सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात (Ashwini Bidre Murder) बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तर आरोपी राजू पाटील यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली. शनिवारी, ५ एप्रिलला पनवेल येथील सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. ११ एप्रिल रोजी शिक्षेची सुनावणी होणार आहे.
न्यायालयाच्या निकालाकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले होते.अभय कुरुंदकरवर अनेक आरोप असताना राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते हे भयंकर असून राष्ट्रपती पदक शिफारस करणाऱ्या कमिटीवर न्यायाधीश संतापले. याप्रकरणात महेश प्रनोकार व कुंदन भंडारी यांचा मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचे सिद्ध झाले. मयत अश्विनी बिद्रे-गोरे (Ashwini Bidre Murder) यांचे पती आनंद गोरे सुनावणीवेळी कोर्टात हजर होते. खून करुन वसईच्या खाडीत फेकला होता मृतदेह अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत हात्या.
हातकणंगले तालुक्यातील आळते हे त्यांचे मूळचे गाव. सामान्य घराण्यातून वरिष्ठ पदावर पोहचलेल्या अधिकारी अशी त्यांची ओळख. अश्विनी बिद्रे-गोरे (Ashwini Bidre Murder) यांचा ११ एप्रिल २०१६ रोजी खून झाला. खून खटल्यात मुख्य संशयित व बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने त्याच्या मीरा रोड येथील घरी अश्विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून केल्याचा तसेच सहकाऱ्याच्या मदतीने मृतदेहाचे लहान-लहान तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिल्याचा आरोप होता. या प्रकरणी ७ डिसेंबर २०१७ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.