Election Candidate : तिकिटासाठी नेत्यांची पळापळ; पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश

ज्या उमेदवारांचे यादीत नाव नाही, तो उमेदवार लगेच पक्ष बदल करून त्या पक्षाच्या वतीने निवडून लढविण्यास सज्ज होत आहे.

159
Election Candidate : तिकिटासाठी नेत्यांची पळापळ; पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश
Election Candidate : तिकिटासाठी नेत्यांची पळापळ; पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश

सध्या पाच राज्यात निवडणूकांची धामधूम सुरु आहे. दररोज पक्षातील उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येत आहे. मात्र ज्या उमेदवारांचे यादीत नाव नाही, तो उमेदवार लगेच पक्ष बदल करून त्या पक्षाच्या वतीने निवडून लढविण्यास सज्ज होत आहे. असंच चित्र बहुदा पाचही राज्यात दिसून येत आहे. यामुळे निवडणुक आणखीच रंगतदार होत आहे. एकमात्र खरंय की, सध्या राजकीय पक्षासोबत बांधिलकी कायम ठेवण्यापेक्षा कशाही प्रकारे राजकारणात कायम राहुन सत्तेत कायम राहणे, हा एकमेव नेत्यांचा उद्देश दिसून येत आहे. (Election Candidate)

शिवाय एकमेकांवर आरोप करण्यात नेते मंडळी आघाडीवर आहेत. तसेच तिकीट वाटपावरुन मध्य प्रदेश भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील २२ विधानसभा जागांवर उमेदवारांना विरोध केला जात आहे. नाराज नेत्यांनी पक्ष सोडण्याची प्रक्रियाही थांबलेली नाही. माजी मंत्री रुस्तम सिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन बहुजन समाज पक्षात (बसपा) प्रवेश केला. तर छतरपूरच्या चांदला मतदारसंघातून भाजपचे आमदार राजेश प्रजापती यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी कोट्यवधी रुपयांना तिकीट विकल्याचा आरोप केला आहे. (Election Candidate)

(हेही वाचा – Maratha Reservation : बीड मध्ये मराठा तरुणाची आत्महत्या)

छतरपूर जिल्ह्यातील चांदला विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार राजेश प्रजापती यांचे तिकीट रद्द करून दिलीप अहिरवार यांना उमेदवारी दिली आहे. प्रजापती २०१८ च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचा चेहरा वाचवणारा एकमेव उमेदवार होते. आमदार प्रजापती म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन देऊन भोपाळहून परिसरात पाठवले होते, परंतु त्यानंतर काही लोकांनी त्यांचे तिकीट रद्द केले. यावेळी आमदार समर्थकांनी व्हीडी शर्मा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. भाजपने दिलीप अहिरवार यांना चांदला येथून उमेदवारी दिली आहे. (Election Candidate)

भिंडमधील भाजपचे माजी आमदार मुन्ना सिंह भदौरिया यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमोर पक्षाचे सदस्यत्व घेतले. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. आता ते अटेर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. या जागेवर भाजपने मंत्री अरविंद भडारिया आणि काँग्रेसने हेमंत कटारे यांना उमेदवारी दिली आहे. आता समाजवादी पक्षातून मुन्ना सिंग भदौरिया रिंगणात उतरल्याने येथील लढत तिरंगी होऊ शकते. (Election Candidate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.