संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये जुंपली

229
संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये जुंपली

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सतार यांच्यात मोठा वाद झाला आहे. औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला आहे.

भुमरे-अंबादास दानवेंमध्ये जुंपली…

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे यांनी आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला.

(हेही वाचा – Online Transaction : …तर कुठल्याही मोबाईल ॲप शिवाय करू शकाल युपीआय पेमेंट)

निधी वाटपावरून वाद

मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आणखीच वाढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हाच वाद औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला. कारण यावेळी शिंदे गटाचे मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्यात राडा पाहायला मिळाला. निधी वाटपावरुन ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी जिल्हा नियोजन समितीत प्रश्न उपस्थित करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. यावरुन पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजपूत यांना उत्तर दिले. यावेळी राजपूत यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे धावून आले आणि वाद सुरु झाला. यावेळी दानवे आणि भुमरे यांच्यात चांगलाच वाद झाला. या वादाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.

तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे?

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदाराला निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.