मराठवाड्यातही Shiv Sena UBT चा बाजार उठणार?

99
मराठवाड्यातही Shiv Sena UBT चा बाजार उठणार?
मराठवाड्यातही Shiv Sena UBT चा बाजार उठणार?

खास प्रतिनिधी

Shiv Sena UBT : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद (dispute) यापुढे शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. उबाठा नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा वाद विकोपाला गेला असून मातोश्रीच्या (Matoshree) माधायमातून तात्पुरता समझोता (temporary settlement) झाला तरी अंबादास दानवे उबाठाची मशाल विझवून शिवसेना शिंदे यांचे धनुष्यबाण (bow and arrows) हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Shiv Sena UBT)

दानवे यांनीच पाडले
खैरे आणि दानवे यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. गेली अनेक वर्षे या दोघांमध्ये विस्तव जात नाही. लोकसभा निवडणुकीसाठी दानवे इच्छुक होते मात्र तिकीट खैरे यांना देण्यात आले आणि ते पुन्हा एकदा आपटले. त्यामुळे संतापलेल्या खैरे यांनी आता, २०१९ आणि २०२४ मध्ये, लोकसभेला दानवे यांनीच आपला पराभव केला, असा उघड आरोप केला आहे. तसेच मंगळवारी १५ एप्रिल २०२५ यादिवशी खैरे यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन दानवे यांच्याविरुद्ध गरळ ओकली. ठाकरे यांनी यावेळी खैरे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असला तरी हा वाद (dispute) आता अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा – IPL 2025, Rohit Sharma : ‘रोहितच कर्णधार हवा’; चाहत्याच्या या म्हणण्यावर संघमालक नीता अंबानींनी दिलं ‘हे’ उत्तर)

दानवे बेरोजगार होणार

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ऑगस्ट २०२५ मध्ये परिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यानंतर त्यांना उबाठाकडून पुन्हा आमदारकी मिळण्याची शक्यता नाही. याचे कारण उबाठाकडे दानवे यांना पुन्हा परिषदेवर निवडून आणण्याइतके संख्याबळ नाही. त्यामुळे येत्या तीन महिन्यात दानवे यांचे विरोधी पक्ष नेतेपद तर जाईलच पण आमदारकीही (MLC) राहणार नाही. त्यामुळे दानवे यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार असल्याने ते एकनाथ शिंदे यांच्या ‘दावणी’ला जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यानिमित्ताने कोकण, विदर्भसोबत आता मराठवाड्यातूनही शिवसेना उबाठाचा ‘बाजार उठणार’, अशी परिस्थिति आहे. दरम्यान, शिवसेनेच्या काही नेत्यांचा दानवे यांना पक्षात घेण्यास विरोध असल्याचे सांगण्यात येते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.