डोंबिवलीत पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. डोंबिवलीमधील शिवसेना शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीमधील मध्यवर्ती शाखेचा ताबा घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने मध्यवर्ती शाखेचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट समोरा-समोर आल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झालेत.
(हेही वाचा – शिंदे गटाच्या आमदारांना भाजपमध्ये घेणार? भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं स्पष्टीकरण)
शिंदे गटाकडून या शाखेचे रजिस्ट्रेशन केल्याचा दावा करण्यात येत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून या शाखेवर दोन्ही गटांत गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या परिसरात तणावाचे वातावरण असल्याने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर डोंबिवलीत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटात सुरू असलेला संघर्ष विकोपाला गेला होता. गुरूवारी झालेल्या या संघर्षानंतर कडक पोलीस बंदोबस्तात डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत खरेदी खत पूर्ण केल्याचा दावा शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या शाखेचे उद्धघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती मिळत आहे. बाळासाहेबांची शिवेसना या वेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community