- खास प्रतिनिधी
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला सोडून काँग्रेसशी हातमिळवणी केली मात्र उबाठाची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. काँग्रेस नेते आता उबाठाला विचारत नसल्याने ठाकरे यांच्यावर काँग्रेसपुढे हात जोडून इंडी आघाडी कायम ठेवण्यासाठी संवाद ठेवा, अशी गळ घालण्याची नामुष्की आली आहे.
नम्र प्रार्थना
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उबाठाचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’चे संपादक असून दैनिकातील संपादकीय सदर म्हणजे संपादकाची भूमिका असते. ‘सामना’मध्ये सोमवारी १३ जानेवारी २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात ‘संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना’ अशी गळ काँग्रेसला घातली आहे.
(हेही वाचा – स्मृती इराणी Delhi Assembly Election लढवणार!)
उबाठाचे अस्तित्व
राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आघाडीतील विविध पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला गेली असून जवळपास संगळ्यांनीच स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे आघाडी यापुढे एकसंघ राहाणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. तसे झाल्यास शिवसेना उबाठाचे अस्तित्व पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता असून अस्वस्थ झालेल्या ठाकरे यांनी अखेर काँग्रेसपुढे लोटांगण घालणेच बाकी ठेवले आहे. (Uddhav Thackeray)
भाजपाशी लढायचे तर…
‘भाजपाशी लढायचे तर ऐक्याची वज्रमुठ ठेवायला हवी, इंडी आघाडीस नेतृत्व आणि एक निमंत्रकही असायला हवा. नाहीतर सगळेच मुसळ केरात जाईल. ते होऊ द्यायचे काय याचा विचार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच करायला हवा. तेव्हा संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना!’ असे ठाकरे यांनी संपादकीय लिहिले आहे. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community