मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल, गडचिरोलीतल्या दुर्गम भागात साजरी करणार दिवाळी

155

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमध्ये दाखल होत तिथल्या जवानांसह दिवाळी साजरी केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नक्षग्रस्त दुर्गम अशा गडचिरोलीमध्ये जाऊन आपली दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याच्या चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीतल्या दुर्गम भागातील पोलिसांसोबत दिवाळी साजरा करणार असून त्याच्याबरोबर भामरागडमधील पोलीस मदत केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानिमित्ताने भामरागडमध्ये आता कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

पालकमंत्री असताना माझं विकासाचं टार्गेट असताना मी दरवर्षी गडचिरोली पोलिसांसह दिवाळी साजरी करत होतो. आज मी मुख्यमंत्री आहे. पण गडचिरोलीचा पालकमंत्री असताना सुरू केलेले काम मी अजूनही सुरू ठेवले आहे. अतिदुर्गम भागात पोलीस नक्षलवाद्यांशी लढून आपलं संरक्षण करतात. त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा हाच उद्देश आहे. आज भामरागड आऊटपोस्टमध्ये पोलिसांसह दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे पोलिसांचे मनोबल वाढेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींशी एकनाथ शिंदेंची तुलना केली जात आहे. काल, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलमध्ये जाऊन जवानांना भेटले होते आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेही त्यांचंच अनुकरण करत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.