Loksabha Elections : निवडणुकीपूर्वी देशवासियांना सरकारकडून दिवाळी भेट

नवीन घर खरेदीत काही सवलती देण्याचा विचार

193
Loksabha Elections : निवडणुकीपूर्वी देशवासियांना सरकारकडून दिवाळी भेट
Loksabha Elections : निवडणुकीपूर्वी देशवासियांना सरकारकडून दिवाळी भेट

पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशवासियांना खास सवलती देण्याचा विचार करीत आहे. विशेषत: पुढील ५-६ महिने सण समारंभांचे आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सण समारंभांचा गोडवा वाढविण्यासाठी तिजोरीचे तोंड सैल करण्याची शक्यता आहे.

भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या निवडणुकीला आता जेमतेम ७-८ महिन्याचा कालावधी उरला आहे. शिवाय हाच ७-८ महिन्याचा काळ सण समारंभांचा आहे. अशात, देशवासियांना काही सवलती देवून सणांचा गोडवा वाढविण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. भारतियांच्या जीवनात दिवाळी दस-याच्या शुभ मुहुर्तावर भारतीय नागरिक घर, वाहन खरेदी करण्याला खूप महत्व आहे. अशात, भाड्याच्या घरात राहणा-या लोकांसाठी नवीन घर खरेदीत काही सवलती देण्याचा विचार सरकारने केला आहे. याची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Home minister : तत्कालीन गृहमंत्री यांचे सचिव असल्याचे सांगून सुरतच्या इंजिनियरची फसवणूक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 आगस्टच्या दिवशी लाल किल्ल्याहून बोलताना ‘विश्वकर्मा योजना’ जाहीर करून 18 जातींच्या लोकांना पारंपारिक व्यवसाय करण्यासाठी पाच टक्क्याने एक लाख रूपये कर्ज देण्याची योजना जाहीर केली होती. सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने सर्व बॅंकांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आधीच आदेश जारी केले आहे. एवढेच नव्हे तर, य विभागाच्या सचिवांनी स्वत: बॅंकांच्या अधिका—यांसोबत बैठक घेवून या योजनेचे महत्व विषद केले आहे.

दस-याला घर खरेदीसाठी सवलत

शहरी भागात भाड्याच्या घरात राहणा-यांसाठी स्वस्त दराने घर खरेदीशी संबधित योजनेची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. दिवाळी आणि दस-याच्या शुभ मुहुर्तावर घर खरेदी करण्याची भारतीयांची परंपरा आहे. यामुळे या सणापूर्वी घोषणा केली तर घर खरेदी करणे सोपे जाईल असे सरकारला वाटते.

नि:शुल्क राशन योजनेचा कालावधी वाढणार

गरिब कल्याण राशन योजनेंतर्गत नि:शुल्क धान्य वितरण करण्याचा कालावधी मार्च महिन्यापर्यंत वाढविण्याची घोषणा सरकारकडून केली जाणार आहे. या डिसेंबरपर्यंत देशातील 81 कोटी लोकांना नि:शुल्क धान्य देण्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर 2020 पासून ही योजना सुरू आहे. यामुळे गरिबांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

पेंशनचे मॉडल बदलणार

पुढील वर्षाच्या बजटमध्ये जुन्या पेंशनचे स्वरूप बदलून ते नवीन स्वरूपात आणण्याची सरकारची तयार आहे. अर्थ सचिवांच्या नेतृत्वात एक समिती यावर कार्य करीत आहे. पेंशनचे नवीन स्वरूप हे जुन्या आणि नवीन यांच्यात समन्वय साधणारा राहणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर ओझे सुध्दा कमी पडेल आणि सरकारी कर्मचा—यांना लाभ सुध्दा मिळेल.

पेट्रोल—डिझेलच्या किमती कमी होणार

सरकार दिवाळी दस-यापूर्वी इंधनावर लागणा-या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा विचार करीत आहे. ही कपात झाली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील आणि याचा फायदा लोकांना मिळेल. तसं बघितलं तर मागच्या मे महिन्यापासून इंधनाच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. भारत रशियाकडून स्वस्त दराने कच्चे तेल आयात करीत असल्यामुळे हा दिलासा मिळाला आहे, हे येथे उल्लेखनीय. पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घरगुती सिलेंडरच्या किमतीत सुध्दा घट होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत सिंलेडरचा मुद्या खूप महत्वाचा झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.