विधानसभा निवडणुकीसाठी युती-आघाडी, उमेदवारी, एबी फॉर्म वाटप, नाराजी, बंडखोरी असे सर्व सुरु असतानाच दिवाळी सण रविवारी संपणार आहे, सोमवार, ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी निवडणुकीतील आव्हाने स्पष्ट होतील, त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र सोमवारीच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यांची पहिली सभा सोमवार, ४ नोव्हेंबरला डोंबिवलीत तर दुसरी सभा ठाण्यात होणार आहे.
सोमवारी, ४ नोव्हेंबरला होणाऱ्या या सभांच्या निमित्ताने राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्यात निवडणूक प्रचाराचा नारळ मनसे (MNS) नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या डोंबिवलीतील सभेत फोडणार आहेत. ही जाहीर सभा कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव, मुरबाडच्या उमेदवार संगीताताई चेंदवणकर यांच्यासाठी असणार आहे. तसेच दुसरी जाहीर सभा मनसे (MNS) नेते अविनाश जाधव यांच्यासाठी ठाण्यात होईल, ही सभा संदीप पाचंगे, कळवा मुंब्रा उमेदवार सुशांत सुर्यराव आणि मिरा-भाईंदर उमेदवार संदीप राणे यांच्यासाठीही असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी & टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व) येथे सोमवारी सायंकाळी ४ वाजता पहिली सभा होईल, त्यानंतर ब्रम्हांड सर्कल, आझादनगर, ठाणे येथे सायंकाळी ६ वाजता दुसरी सभा होणार आहे.
Join Our WhatsApp Community