शाळेत कुर्ता परिधान केला म्हणून पगार रोखला, मुख्याध्यापकाला जिल्हाधिकाऱ्याकडून दमदाटी

137

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जिल्हा दंडाधिकारी (डीएम) एका शाळेच्या मुख्याध्यापकाला खडसावत दमदाटी करताना दिसत आहेत. ही अरेरावी करण्याचे कारण तुम्ही ऐकलं तर तुम्हाला देखील धक्का बसेल. हा व्हिडिओ आणि घटना बिहार मधील असल्याचे सांगितले जात आहे. बिहारमधील एका शाळेतील मुख्याध्यापकांनी कुर्ता-पायजमा घालून खांद्यावर गमछा घेतला होता. हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मुख्याध्यापकाचे पगार थांबवावेत आणि कारणे दाखवा नोटीसही बजावावी असे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – “…हीच आपली इच्छा, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं”; राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र)

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील बालगुदर पंचायतीच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी सगळेच असताना दौऱ्यावर असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी मुख्याध्यापकांनी कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यांच्या खांद्यावर गमछा होता. हे पाहून जिल्हाधिकारी संतापले. ते आक्रमक होत त्यांनी मुख्याध्यापक निर्भय कुमार सिंग यांना विद्यार्थ्यांसमोर चांगले-वाईट ऐकवले आणि अरेरावी करत दमदाटी केली.

काय म्हणाले जिल्हाधिकारी…

जिल्हाधिकारी म्हणाले, कोणत्याही प्रकारे तुम्ही शिक्षकासारखे दिसत नाही, आम्हाला वाटले की तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही शिक्षक आहात का? तुम्ही शिक्षक आहात तर, स्वतःचे राहणीमान असे ठेवू नका… जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून म्हणाले, हे शिक्षक तुमचे मुख्याध्यापक आहेत, हे कुर्ता आणि पायजमा घालून नेत्यासारखे आमच्यासमोर बसले आहेत. इतकेच नाही तर ते मुलांना शिकवत आहेत. निर्भय कुमार सिंग असे त्याचे नाव आहे. त्यांचे नाव नोंदवून घ्या आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवा, त्यांचा पगार ताबडतोब थांबवा…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.