Sanatan Dharma Defamation : सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करणारे द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर ‘या’ राज्यांत गुन्हे दाखल

125
Sanatan Dharma Defamation : सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करणारे द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर 'या' ४ राज्यांत गुन्हे दाखल
Sanatan Dharma Defamation : सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करणारे द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर 'या' ४ राज्यांत गुन्हे दाखल

सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करणारे द्रमुकचे नेते तथा तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर दिल्ली, बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्र यासह अन्य अनेक राज्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Sanatan Dharma Defamation) नुकताच मुंबईतील मीरा रोड पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 153 अ आणि 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी उत्तरप्रदेशमधील वकिलांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका वकिलानेही मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.यूपी-बिहारसह अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखलउदयनिधी यांच्यावर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

(हेही वाचा – Fertilizers increased : जागतिक बाजारात खतांची किंमत वाढली, रशियाकडून सवलतीच्या दरात खते विक्री बंद)

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.’सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.  उदयनिधी स्टॅलिन यांनी 2 सप्टेंबर रोजी चेन्नईतील कामराजर मैदानात आयोजित ‘सनातन निर्मूलन परिषदे’त सहभागी होताना हे वादग्रस्त विधान केले होते. (Sanatan Dharma Defamation)

उदयनिधी स्टॅलिन यांच्यानंतर खासदार ए राजा आणि दिग्दर्शक प्रकाश राज यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  ‘मी म्हणतो सनातन धर्माची तुलना ही सामाजिक कलंक असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरियाशी केली आहे. मात्र सनातन धर्माची तुलना ही एचआयव्ही आणि कुष्ठरोग यासारख्या सामाजिक घृणास्पद असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे’, असे खासदार ए राजा यांनी म्हटले आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावर भाजपने द्रमुक आणि विरोधी आघाडी I.N.D.I.A.वर टीकेची झोड उठवली आहे. हे वक्तव्य समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहांपर्यंत सगळ्यांनीच या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सनातन धर्मावरील टीकेचा सर्वानी निषेध व्यक्त केला आहे.  (Sanatan Dharma Defamation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.