२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूतून (Tamil Nadu) द्रमूकचा (DMK) सुपडासाफ करणार, अशा इशारा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी द्रमुक पक्षाच्या स्टॅलिन (Stalin) यांच्यावर केला आहे. नवी दिल्लीत एका न्यूज चॅनेलतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना शाह (Amit Shah) यांनी हे वक्तव्य केले.
( हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय हुशार व्यक्ती”; Donald Trump यांनी प्रशंसा करत आयात शुल्काबाबत दिला इशारा)
गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, तामिळनाडू (Tamil Nadu) एकेकाळी अत्यंत प्रगत राज्य होते, परंतु DMK सरकारच्या धोरणांमुळे ते अराजकतेच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे लोक नाराज झाले असून, ते पुढील विधानसभा निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून हटवण्यास तयार आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन (M K Stalin) यांचा सत्ताधारी DMK हा तमिळविरोधी आहे. तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारने अद्याप तामिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण सुरू केलेले नाही. तमिळ भाषेत पुस्तकेदेखील भाषांतरित केलेली नाहीत. (M K Stalin)
तसेच २०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दक्षिणेकडील या राज्यात NDA सरकार स्थापन होईल. तामिळनाडूमधील (Tamil Nadu ) DMK सरकार केवळ भ्रष्टाचारातच गुंतले आहे, त्यामुळे उद्योग व तरुण मोठ्या प्रमाणात राज्याबाहेर स्थलांतर करत आहेत. तामिळनाडू हे एकेकाळी दक्षिण भारतातील सर्वात प्रगत राज्य मानले जात होते. मात्रते द्रमुकच्या सत्ताकाळात अराजकतेच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे जनता द्रमुक (DMK) सरकारबाबत असंतुष्ट आहे. आगामी निवडणुकीत तामिळनाडूमध्ये निश्चित्तच NDA सरकार स्थापन होईल. अलीकडच्या काळात तामिळनाडूला (Tamil Nadu) भेट दिली तेव्हा तेथील जनतेच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आला, असेही शाह म्हणाले. (Tamil Nadu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community