शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या एका विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पुणे दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. पावसामुळे पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी घरांमध्ये गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले. (Raj Thackeray)
(हेही वाचा –Tourism Department चे असणार आता एकच बोधचिन्ह व घोषवाक्य )
शरद पवार नेमके काय म्हणाले होते, ते देखील वाचा…
शरद पवार म्हणाले होते की, मणिपूरमध्ये (Manipur case) जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झाले आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावे असे वाटले नाही. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडले तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये कर्नाटकातही घडले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असे काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपले राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिले आहे. असे शरद पवार यांनी म्हटले होते. (Raj Thackeray)
(हेही वाचा – कोरोनानंतर डिजिटल व्यवहारात ५७ टक्क्यांनी वाढ; PhonePe आणि Google Pay यांचा किती आहे सहभाग?)
उपमुख्यमंत्री पुण्याचेच आहेत तरीही पुण्यात ही स्थिती? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्याला दोन उपमुख्यमंत्री असले तरी लक्ष कुणाचेच नाही. अशी स्थिती असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे. केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील परिस्थितीची पाहणी केली. त्या नंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. (Raj Thackeray)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community