मलिकांना सोबत घेवू नका; VHP चे Ajit Pawar यांना आवाहन

विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक (Nawab Malik) यांची गरज असली तरी सक्रिय राजकारणात मलिक यांना बरोबर घेऊ नये, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केले आहे.

142
मलिकांना सोबत घेवू नका; VHP चे Ajit Pawar यांना आवाहन
मलिकांना सोबत घेवू नका; VHP चे Ajit Pawar यांना आवाहन

आमदार नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सहभागी झाल्याने भाजपच्या गोटातून त्याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. विधान परिषद निवडणूक असल्याने याबाबत सध्या तरी भाजपने उघडपणे भूमिका घेतलेली नाही. मात्र, विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक (Nawab Malik) यांची गरज असली तरी सक्रिय राजकारणात मलिक यांना बरोबर घेऊ नये, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केले आहे.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojna साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?)

गोविंद शेंडे पुढे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत मते महत्त्वाची असल्याने अजित पवारांची सध्या मजबुरी आहे. नवाब मलिक या निवडणुकीत मतदार आहेत, त्यामुळे ते अजित पवारांच्या बैठकीला आले असतील; पण भाजपसोबत नवाब मलिक सक्रिय राजकारणात असणे, हे या देशातील आणि प्रांतातील कोणीही नागरिक सहन करत नाही, याबाबत अजित पवारांनी दक्षता घ्यावी.

भाजपची कोंडी

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीपूर्वी माजी मंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला नवाब मलिकही उपस्थित होते. त्यामुळे भाजपची आता कोंडी झाली आहे. त्यातच विश्व हिंदू परिषदेच्या (Vishva Hindu Parishad) एका नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सल्ला दिलाय.

नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट झाली आहे. दोघांमध्ये महायुतीतली राजकीय स्थिती, लोकसभेचं नुकसान आणि आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.

काय आहेत वाद ?

नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. पण आता ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे मानले जात आहे. NCP चे नेते नवाब मलिक हे NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे वादात सापडले आहेत. राज्यात सरकार बदलल्यानंतर मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत वाढ झाली. यानंतर त्यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.