विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना बरेच सदस्य सभागृहात मोबाईलवर बोलताना दिसतात. त्याची गंभीर दखल घेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यापुढे सभागृहात मोबाईल वापरू नका, अशी सक्त ताकीद आमदारांना दिली.
विधानपरिषद सभागृहात सोमवारी पंढरपूर कॉरीडोअरच्या संदर्भात लक्षवेधीवर चर्चा सुरू होती. या चर्चेत महादेव जानकर, अमोल मिटकरी, सचिन अहीर, मनीषा कायंदे, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला. ही चर्चा सुरू असताना काही सदस्य मोबाईलवर बोलत असल्याची बाब काही सदस्यांसह उप सभापती निलम गोऱ्हे यांच्याही लक्षात आली. त्याची दखल घेत त्यांनी सदस्यांना कडक शब्दांत समज दिली.
( हेही वाचा: राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे नव्हे; एकनाथ शिंदे… )
‘तुमचं फोनवरील बोलणं आम्हाला वर ऐकू येतं’
यासंदर्भात बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या, या सभागृहातील सर्व सदस्य हुशार आणि समजदार आहेत. त्यामुळे चर्चा सुरू असताना त्यांनी मोबाईल फोनवर बोलू नये, अशी सामान्य अपेक्षा आहे. समज दिल्यावरही काही सदस्य समोर कागद धरून कागद वाचत असल्याचे भासवत मोबाईलवर बोलतात. पण हे आमच्या लक्षात येते आहे. कृपया असं करू नका. कारण तुमचं बोलणं आम्हाला वरती ऐकू येतं.
Join Our WhatsApp Community