ईडी भाजपा चालवते कि भाजपा ईडीला चालवते? 

सीबीआय असो किंवा ईडी असो या यंत्रणा आता कुणाला नोटीस देणार, याची भाजप आधीच माहिती देत आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

ईडीच्या नोटिसा म्हणजे हा राजकीय दबाव आहे. भाजपाचे लोक सोशल मीडियावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांच्या नावांची यादी जाहीर करतात. तशी त्यांनी ११ जणांची यादी जाहीर केली आहे. त्याहीपुढे जात ईडी आता त्यातील कुणाला समन्स बजावणार हेही ते सांगतात. त्यामुळे  ईडी भाजपा चालवते कि भाजपा ईडीला चालवते, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

समन्स ईडीचा असतो कि भाजपाचा? 

सीबीआय असो किंवा ईडी असो या यंत्रणा आता कुणाला नोटीस देणार, याची भाजप आधीच माहिती देत आहे. यावरून भाजप ईडी चालवते कि भाजप ईडी चालवते, याचा शोध घेतला पाहिजे. येणारा समन्स हा ईडीचा असतो कि भाजपाचा असतो?, असे सांगत आम्हाला फक्त डिफेन्सचे रडार माहीत असते. शत्रूचे सैन्य या रडारमधून दिसते. तसे जर आमच्यासाठी भाजपा आणि ईडीने रडार बसवला असेल आणि त्यांना आम्ही दुष्मन वाटत असू तर हे चुकीचे आहे, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : मंत्री अनिल परबांची पदोन्नती भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी! कुणी दिले आदेश?)

भाजपावाले त्यांच्याच सरकारचे ऐकत नाहीत!

केरळमध्ये जरा सूट दिली तर तिथे तिसरी लाट येऊ घालत आहे. या निर्बंधांविरोधात जे कोणी बोलत आहेत, त्या राजकीय पक्षांना जनतेत बेस उरला नाही. केन्द्र सरकारनेच दहीहंडी आणि गणेशोत्सव यांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. हे जर भाजपाच्या कार्यकर्त्यांना कळत नसेल तर त्यावर काय बोलणार? असे असेल तर मग आम्ही हिंदुत्वविरोधी कसे ठरतो? भाजपावाले त्यांच्याच सरकारचे ऐकत नाही, असे राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here