केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उपस्थित पत्रकारांपैकी काही पत्रकारांनी Vote Jihad या शब्दामुळे आचारसंहितेचा भंग होतो का, असा प्रश्न लावून धरला, त्यामुळे अखेर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी, आपल्याकडे जे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे, त्या तुलनेत कुणी वैयक्तिक किंवा जाहीर मते मांडली त्यावर कायद्यात काहीतरी उल्लेख आढळतो. कायद्याच्या बाहेर जाणारे विधान असेल तर त्यावर निश्चित कार्यवाही होते. ‘वोट जिहाद’ याबाबत नक्की काय झाले आहे, पुरावे काय आहेत यावर अवलंबून असेल, असे म्हटले.
लोकसभा निवडणुकीनंतर काही राजकीय पक्षांकडून विशिष्ट समाजाबद्दल मतदान विरोधात गेल्याने ‘वोट जिहाद’ असा प्रचार केला जातो, हा आचारसंहितेत बसतो का? यावर कारवाई काय होऊ शकते? अशी प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांनी केली, त्यावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी कुलकर्णी म्हणाले, याविषयावर आम्ही कायदेशीर सल्ला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊ, असे सांगितले.
(हेही वाचा Congress ने लोकसभा निवडणुकीत लाच म्हणून वापरला सरकारी निधी; ईडीच्या चार्जशीटमध्ये खुलासा)
‘सायबर सेल’ ची नजर
समाजमाध्यमांद्वारे पोस्ट केल्या जाणार्या आक्षेपार्ह संदेशांची पडताळणी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी समाजमाध्यमांच्या आस्थापनांसोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली आहे. त्यामुळे आक्षेपार्ह संदेशांच्या विरोधात तत्काळ कारवाई केली जाईल, तसेच चुकीची माहिती देणार्या संदेशांविषयी योग्य माहिती देण्यात येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community