Dominica या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना जाहीर

40
Dominica या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना जाहीर
Dominica या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना जाहीर

कोरोना काळात संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण होते. कोरोना कसा जाईल, या चिंतेने जगाला ग्रासले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या खंबीर नेतृत्वात मात्र भारतात लस कशी बनविली जाईल, यांची तयारी सुरु होती. त्यामुळे लगेच कोरोनावर लस आली आणि भारत सुखरूप बाहेर पडला. एवढेच नव्हे तर इतर देशांना देखील भारत निर्मित लस पुरविण्यात आली. त्या पैकी डोमिनिका या देशाने पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. हा सन्मान देशासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.

कोरोना काळात भारताने अनेक देशांना लस आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात दिला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कामाचे अनेक देशांनी कौतुक केले. डोमिनिका (Dominica) या देशाने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. यापूर्वीही अनेक देशांनी मोदींना सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले आहे. या यादीत डोमिनिकाचाही (Dominica) समावेश झाला आहे. मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव म्हणून या देशाने मोदींना सन्मानित केले आहे. यामुळे भारताची मान उंचावली आहे.

(हेही वाचा – Mohammed Shami अर्ध्यातच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल का?)

कोरोना काळात अनेक देशांना लस आणि औषधांचा तुटवडा जाणवत होता. अशावेळी भारताने मदतीचा हात पुढे करत या देशांना लशीचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पंतप्रधान मोदींनी या कठीण काळात घेतलेल्या निर्णयांचे डोमिनिका सरकारने कौतुक केले आहे.

उत्तर अमेरिकेतील कॅरेबियन बेटांवर डोमिनिका हो देश आहे. या देशाकडून ‘अवॉर्ड ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. कोरोना काळात भारताने डोमिनिकाला मोठी मदत केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबुत झाल्याचे डोमिनिकाने म्हटले आहे. मोदींना सन्मान देऊन या देशाने हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

डोमिनिका (Dominica) सरकारने याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फेब्रुवारी 2021 मध्ये डोमिनिकाला (Dominica) भारताने कोरोना लशीचे 70 हजार डोस पाठवले होते. तसेच भारताने आरोग्य, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डोमिनिकाला मदत केली. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा सन्मान दिला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.