Dominican देशाने आर्थिक संकटामुळे काढले नागरिकत्व विकायला; किंमत १ कोटी ७० लाख

57

अमेरिकेसारख्या अनेक बलाढ्या देशांना सुद्धा अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी इतर देशांकडून किंवा आंतराराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून कर्ज उभारण्याचा पर्याय निवडला जातो. पण या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एका (Dominican) देशानं आपलं नागरिकत्व (Republic Citizenship) विकायला काढल्याची घटना घडली आहे.

(हेही वाचा : गेल्या वर्षीच्या तुलनेत Road Accidents मध्ये घट; मृत्यूंची संख्या घटली)

नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कॅरेबियन बेटांमधला डॉमिनिका (Dominican) या देशानं आर्थिक गरज भागवण्यासाठी देशाचं नागरिकत्व (Republic Citizenship) विकत काढले आहे. मुळात जवळपास सात वर्षापूर्वी या देशातील काही भागाला मारिया चक्रीवादळाचा तडाखा बसला. ज्यामुळे या देशाचं आर्थिक कंबरडच मोडलं. अविकसित देशांच्या यादीतील डॉमिनिकन (Dominican) रिपब्लिकनची गेल्या सात वर्षांपासून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरु आहे. पण त्यांना अपेक्षित यश मिळत नसल्याने त्यांनी देशाचे नागरिकत्व विकण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान डॉमिनिकन (Dominican) देशाकडून ‘सिटिझनशिप- बाय- इन्व्हेस्टमेंट’ ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेची तरतूद ९० च्या दशकात केली होती. या धोरणानुसार, जगभरातल्या श्रीमंत, अतिश्रीमंत देशामध्ये घसघशीत गुंतवणूक करण्याची अट घातली आहे. किमान गुंतवणूकीची रक्कम २ लाख अमेरिकन डॉलर्स अर्थात भारतीय रुपयांमध्ये जवळपास १ कोटी ७० लाख रुपये इतकी करण्यात येणार आहे. यामधून मिळणाऱ्या निधीचा वापर देशाकडून पायाभूत सुविधा,वैद्कीय उपचार, केंद्रे व चक्रीवादळात उद्धवस्त झालेल्या घरांची उभारणी अशा कामासाठी करण्यात येणार आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.