- ऋजुता लुकतुके
येत्या २० जानेवारीला अमेरिकेत एका शाही कार्यक्रमात डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा (Donald Trump 2.0) राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. आणि या सोहळ्यासह ट्रंप २.० कारभार अमेरिकेत सुरू होईल. सध्याची थंडी पाहता हा सोहळा कॅपिटॉल इमारतीत इनडोअर होणार आहे. या सोहळ्यासाठीच्या निमंत्रितांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी (Nita Ambani) यांचा समावेश आहे.
ट्रंप यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य सदस्य, अमेरिकन प्रशासकीय अधिकारी आणि जगभरातून आलेले निमंत्रित पाहुणे यांच्यामध्ये मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता (Nita Ambani) यांना मानाचं स्थान असणार आहे. पदग्रहण सोहळ्यानंतर रात्री विशेष कँडललाईट डिनर होणार आहे. त्यानंतर अंबानी दांपत्य उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स आणि उषा व्हान्स यांची खाजगी भेट घेणार आहेत.
(हेही वाचा – Hawkers : फेरीवाल्यांसाठी काय पण! महापालिकेचे अधिकार आता न्यायालयालाही जुमानेनात)
डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर दुसऱ्यांदा विराजमान होत आहेत. ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. ट्रंप यांच्या पदग्रहण सोहळ्यात परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर हे भारताकडून अधिकृतपणे सहभागी होतील. या सोहळ्यानंतर जयशंकर अमेरिकेचा छोटेखानी दौरा करणार असून ट्रंप प्रशासनातील नवीन लोकांच्या ते गाठीभेटी घेतली. ट्रंप (Donald Trump 2.0) आणि व्हान्स यांच्या उद्घाटन समितीने या सोहळ्यासाठी जगभरातील नेत्यांना आमंत्रित केलं आहे.
इटालियन पंतप्रधान गिओर्गिओ मिलोनी, अर्जेंटिनाचे पंतप्रधान झेविअर मिलेई, अ सालवाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायिब बुकेले, हंगेरीचे पंतप्रदान व्हिक्टर ओरबान तसंच ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांनाही सोहळ्याचं आमंत्रण आहे. आणि ते प्रमुख अतिथी असतील. तर उद्योजकांमध्ये ओपन एआयचे अध्यक्ष सॅम ऑल्टमन, मेटाचे मार्क झुकरबर्ग, उबरचे दारा खोस्त्रोशाही तसंच टेस्लाचे एलॉन मस्क (Elon Musk) या सोहळ्याला हजर असणार आहेत. तसंच अमेरिकन उद्योजकांनी एलॉन मस्क यांच्या पुढाकाराने ट्रंप यांच्या पदग्रहणानंतर त्यांच्या स्वागतासाठी एक पार्टीही आयोजित केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community